जळगाव जिल्ह्यात तीन एकर ऊस जळून खाक

जळगाव : वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे राज्यात शॉर्टसर्किटमुळे मागील काही दिवसांत उसाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना पुन्हा मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तळोदा येथे घडली आहे. येथील विजयकुमार शेंडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली होती. तोडणीवर आलेल्या या उसाला अचानक मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत शेंडे यांचा ऊस पूर्णपणे जळाला असला तरी आजूबाजूची पिके वाचविण्यात शेतकरी बांधवांना यश आले.
याप्रकरणी शेतकरी विजयकुमार कांतीलाल शेंडे यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात आगीची नोंद केली आहे. दरम्यान, आगीच्या घटनेची चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी आहे.






