साखर स्वस्तात देण्याच्या आमिषाने  तीन लाखाला गंडवले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बार्शी : तालुक्यातील आगळगाव येथील एका दुकानदारास साखरेच्या गोण्या स्वस्तात देतो, असे सांगून अज्ञाताने ३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत संताजी विजय जाधव (वय ४५, रा. आगळगाव, धनगरवाडी) यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक महितीनुसार, फिर्यादी संताजी जाधव हे मुलाला नेण्यास बार्शी बस स्टँडवर आले होते. तेथे शेजारी अनोळखी व्यक्ती साखर स्वस्तात विकण्याबाबत बोलत होती. त्यावेळी फिर्यादी तरुणाने नुकतेच मी एक नवीन किराणा दुकान टाकले आहे. त्यासाठी माझ्या दुकानात विक्रीसाठी स्वस्तात साखर मिळेल का ? असे विचारताच त्यास प्रथम बार्शीत बोलवून येथील एका किराणा स्टोअर्समधून प्रथम २ क्विंटल साखर घेऊन ७२०० रुपये घेऊन गेला. पुढे अधिक विश्वास निर्माण होताच त्याने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत फोन करून २०० गोण्या साखरेचा माल आहे, स्वस्तात देतो, माल खरेदी करा त्यात १ लाख रुपयाचा फायदा होईल, असे सांगून नादी लावले.

दरम्यान साखरेची पोती टेम्पोत भरत असताना अनोळखी व्यक्ती व फिर्यादी हे चहा पित बसले. त्या गोणींचे त्यांनी पैसे मागितले असता जवळ असलेले ३ लाख रुपये फिर्यादीने दिले. साखरेला मुंग्या लागू नये यासाठी फिर्यादी स्प्रे आणायला गेला. दरम्यान, अनोळखी व्यक्ती तेथून पसार झाल्याने आपली फसवूणक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी संताजी जाधव यांनी पोलिस ठाणे गाठून संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »