विष्णुपंत मोरेश्वर छत्रे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, फेब्रुवारी २०, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १, शके १९४४
सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:४१
चंद्रोदय : ०७:१० चंद्रास्त : १८:५४
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – १२:३५ पर्यंत
नक्षत्र : धनिष्ठा – ११:४६ पर्यंत
योग : परिघ – ११:०३ पर्यंत
क्षय योग : शिव – ०६:५७, फेब्रुवारी २१ पर्यंत
करण : नाग – १२:३५ पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – २२:४७ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : ०८:३१ ते ०९:५८
गुलिक काल : १४:१९ ते १५:४६
यमगण्ड : ११:२५ ते १२:५२
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१६
दुर्मुहूर्त : १३:१६ ते १४:०२
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२१
अमृत काल : ०२:३८, फेब्रुवारी २१ ते ०४:०३, फेब्रुवारी २१
वर्ज्य : १८:०८ ते १९:३३

आज जागतिक सामाजिक न्यायदिन आहे

विष्णुपंत मोरेश्वर छत्रे – भारतीय सर्कस ही युरोप-अमेरिकेच्या तुलनेत काहीशी उशिरा सुरू झाली. भारतीय सर्कसचे जनक होते विष्णुपंत मोरेश्वर छत्रे! छत्रे घराणे मूळचे बसणीचे. हे छोटेसे खेडेगाव गणपतीपुळे देवस्थानापासून सात-आठ किमी अंतरावर आहे. विष्णुपंतांचे वडील संस्थानी चाकरी करीत. त्यानिमित्त फिरत असताना, त्यांच्या मातोश्री व पत्नी, मुलेबाळे अंकलखोप येथे रहात असत. सांगली जिल्ह्यातील तासगावजवळ हे गाव आहे. इ.स. १८४० मध्ये विष्णुपंत छत्रे यांचा जन्म येथे झाला.

विष्णुपंत शाळेत फारसे रमले नाहीत. सवंगड्यांबरोबर हुंदडण्यात आणि कुत्री, माकडे, ससे, कबुतरे यांच्यात ते रमून जात. १६व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. जमखिंडीकर पटवर्धन संस्थानिकांच्या घोड्यांच्या पागेत, घोड्यावर स्वार होऊन घोडदौड करायला ते शिकले. पाठोपाठ रामदुर्ग संस्थानात चीफसाहेब श्रीमंत भावे यांच्या आश्रयाखाली ते चाबुकस्वार म्हणून नेमले गेले. मात्र, तेथे ते दोन वर्षेच राहिले. दररोजच्या कसरतीमुळे काटक व पिळदार बनलेली शरीरयष्टी, घौडदौडीतील चपळाई आणि धाडस करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना.

शास्त्रीय संगीताचेही त्यांना विलक्षण आकर्षण होते. त्यामुळे नशीब आजमावयाला ते ग्वाल्हेर संस्थानाकडे निघाले. तेथे श्रीमंत बाबासाहेब आपटे हे घोडी शिकवून तयार करण्याच्या कामात वाकबगार होते, तर नावाजलेले गायक हदद खाँ तेथेच दरबारी होते. आपली दोन्ही स्वप्ने पूर्ण होतील; म्हणून विष्णुपंत ग्वाल्हेरला निघाले. पैशाचे पाठबळ नव्हते. जेमतेम जळगावपर्यंत त्यांनी रेल्वेने प्रवास केला. पैसे संपले. मग माधुकरी मागत ते चक्क पायी काही महिन्यांनी ग्वाल्हेरला पोहोचले.

श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे व विष्णुपंतांचे गुरु-शिष्याचे नाते जडले. घोड्यांच्या कसरतीत त्यांनी अथक मेहनत घेऊन प्रावीण्य मिळवले. अनेक अवघड कसरती ते लीलया करू लागले. सुमारे ८ ते १० वर्षांच्या या कालावधीत श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे ते पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्रात परतले, ते ‘अश्वविद्या पारंगत’ म्हणूनच! इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार अशा अनेक संस्थानांत ते घोड्यांना चाल आणि कवायतीचे शिक्षण देऊ लागले. त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली. अनेक संस्थानिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले.

कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला. विष्णुपंत छत्र्यांनी तरुण कलाकार आणि तेजदार घोडे घेऊन कुरुंदवाड येथे सर्कशीची तालीम सुरू केली आणि अवघ्या ८-१० महिन्यांत सर्कस मूर्त स्वरूपात आणली.

मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर फर्ग्युसन हे कुरुंदवाडकरांकडे आले होते. त्यांच्यासमोर ‘खास अदाकारी’ म्हणून विष्णुपंत छत्र्यांच्या घोड्यांच्या कसरती सादर करण्यात आल्या. जेमतेम १० मिनिटे हे खेळ पाहण्यास वेळ देणाऱ्या गव्हर्नर फर्ग्युसनांना विष्णुपंत छत्र्यांच्या खेळांमुळे वेळेचे भानच राहिले नाही अन् ४५ मिनिटे ते हा शो बघत राहिले. विष्णुपंतांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. यामुळे विष्णुपंतांची उमेद वाढली. त्यांच्या मित्रांनी आणि आश्रयदात्यांनी मुंबईत जाऊन शो करण्याचा आग्रह धरला आणि त्यातूनच नोव्हेंबर १८८२ मध्ये ‘ग्रँड इंडियन सर्कस’ ही विष्णुपंत छत्र्यांची सर्कस मुंबईच्या क्रॉस मैदानावर उभी राहिली.

२६ नोव्हेंबर १८८२ मध्ये या सर्कसचा पहिला शो म्हणजे ‘भारतीय सर्कसचा जन्म’ होता.

विष्णुपंत छत्रे यांच्या या पहिल्या भारतीय सर्कशीत पाश्चात्यांचे कसलेही अनुकरण नव्हते, तर स्वतंत्र अशा भारतीय बाण्याने ती उभी होती. देशभक्ती हा जणू तिचा आत्माच होता. या सर्कशीत एका खेळात एक तरुणी भारतमाता होऊन रथात बसून येई. तो रथ दोन सिंह ओढून आणत आणि रिंगणात आल्यावर ‘गणा’ नावाचा हत्ती त्या भारतमातारूपी तरुणीस व गणपतीस हार घालून पूजा करी. अशाप्रकारे छत्रे यांची सर्कस स्वातंत्र्यभावनेने प्रेरित होऊन काम करीत होती.

त्यानंतर ‘छत्रे सर्कस’ देशभर फिरत राहिली. नवनवीन प्रयोग, नवनवीन तंत्रांचा वापर करत राहिली. गॅसच्या बत्त्यांचा वापर करून त्यांचा शो सायंकाळीही व्हायचा. छत्र्यांनी ही सर्कस अधिक आकर्षक केली. पुढे कालौघात त्यांनी सर्कसची सारी धुरा त्यांचे बंधू काशिनाथपंत यांच्याकडे सोपवली व ते त्यांचे गायकीतील गुरूबंधू रहिमतखाँसाहेब यांच्याबरोबर देशाटनास निघून गेले. भारतीय सर्कसचा हा जनक स्वतःचे नाव अजरामर करून गेला.

१९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन. (जन्म :इ.स. १८४६)

घटना :
१७९२: अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.
१९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
२०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.

• मृत्यू :
१९५०: स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)
१९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.
१९९४: घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.
१९९७: पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.
२००१: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)
२०१२: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्नाकर मंचरकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)

जन्म :
१९०९ : भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक अजोय घोष यांचा जन्म ( मृत्यू : १३ जानेवारी, १९६२)
१९३२ : प्रसिध्द्य कन्नड नाटककार कुंटागोडू विभूति सुबन्ना ( के. वी. सुबन्ना ) यांचा जन्म . ( मृत्यू : १६ जुलै, २००५)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »