प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

|| सुप्रभात ||
आज शुक्रवार, जानेवारी २६, २०२४ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक माघ, ०५, शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२८
चंद्रोदय : १९:०४ चंद्रास्त : ०७:४५
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : प्रतिपदा – ०१:१९, जानेवारी २७ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – १०:२८ पर्यंत
योग : प्रीति – ०७:४२ पर्यंत
करण : बालव – १२:१८ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०१:१९, जानेवारी २७ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ११:२७ ते १२:५१
गुलिक काल : ०८:३८ ते १०:०३
यमगण्ड : १५:३९ ते १७:०४
अभिजितमुहूर्त : १२:२९ ते १३:१३
दुर्मुहूर्त : ०९:२९ ते १०:१४
दुर्मुहूर्त : १३:१३ ते १३:५८
वर्ज्य : ००:३८, जानेवारी २७ ते ०२:२४, जानेवारी २७

भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

१९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
आज प्रजासत्ताक दिवस आहे.

“ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा “

राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ साली तामंगलगोंग जिल्ह्यातील सध्याच्या तौसम उप-विभागात मणिपूरमधील नुंगका (किंवा लांबकाओ) गावात झाला. त्या रोंगमेई टोळी (सुद्धा काबुई म्हणून ओळखली जाणारी) ओळखल्या जात होत्या. लोंथोनांग पामेली आणि कच्छकलेन्ली या दांपत्यापासून जन्मलेल्या सहा बहिणी, एक धाकटा भाऊ – हाय पो जा दो आणि राणी ह्या आठव्या क्रमांकावर होत्या.हे कुटुंब गावातील सत्ताधारी वंशांचे सदस्य होते.

राणी गाइदिन्ल्यू ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या. ज्यांनी भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले.

वयाच्या १३ व्या वर्षी त्या हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एका राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या. उपासेनसाठी त्यांनी स्वतः: मंदिर उभे केले. या उभारलेल्या चळवळीत सर्वच जण पेटून उठले व सामील झाले. पुढे त्यांचा भाऊ हाय पो जा दो याला १९३१ मध्ये ब्रिटिशांनी फसवर लटकवले.

त्यांनंतर राणी गाइदिन्ल्यू हि राजकीय प्रेरणा देणारी त्यांची वारस ठरली.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राणीला १८ ऑक्टोबर , १९३२ मध्ये अटक करण्यात आली. व नंतर नराधम ब्रिटिश सरकारने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

एकूण १४ वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगल्या नंतर व भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९४७ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.

तिने आपल्या एलियन ग्राउंड ग्रँग नागा समाजाच्या उन्नतीचे कार्य पुढे चालू ठेवले. १९६६ मध्ये माझा नॅशनल कौन्सिल एन सी च्या विरोधात प्रतिकार चळवळ सुरु ठेवली. तसेच १९६० च्या सुमारास भूमिगत व्हावे लागले.

त्यांचा स्वातंत्र्य सेनानी म्हणून गौरव करण्यात आला. १९८१ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तेच १९८३ मध्ये विवेकानंद सेवा पारितोषिकाने सन्मानित केले.

जोरहाट , आसाम व १९७९ मध्ये प्रयाग येथे झालेल्या विराट हिंदू संम्मेलनात राणी मा उपस्थित होत्या . संघ , विश्व हिंदू परिषद , राष्ट्र सेविका समिती तसेच प.पू . श्री गुरुजी , शी बाळासाहेब देवरस यांचे शी सुद्धा त्या संपर्कात होत्या. विविध राष्ट्रीय विषयांवर त्यांची नेहमीच देशहिताची भूमिका असायची.

१९७२ मध्ये ताम्रपट देऊन स्वातंत्र्य सेनानी म्हणून गौरव करण्यात आला. १९८१ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तर १९८३ मध्ये विवेकानंद सेवा पारितोषिकाने सन्मानित केले.
२०१५ साली त्यांच्या जन्म शताब्दी चे औचित्य साधून शासनाने विशेष नाणे काढले.

राणी यांची जीवन यात्रा १७ फेब्रुवारी १९९३ ला संपली. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी आपल्या तेजोमय जीवनाच्या सार्थकतेची सांगता पूर्ण केली.

१९१५ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित स्वातंत्र्य सेनानी राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म ( मृत्यू : १७ फेब्रुवारी १९९३ )

घटना :
१५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
१६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
१८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
१९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

• मृत्यू :

• १९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट, १८८०)
• २०१५: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर, १९२१)

जन्म :
१८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७)
१९२६ : विचारवंत लेखक, साहित्यिक. विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर यांचं जन्म ( मृत्यू : ३० ऑगस्ट , २०१६ )

आपला दिवस मंगलमय जावो

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »