किशोरकुमार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, ऑक्टोबर १३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २१ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१७
चंद्रोदय : १५:२३ चंद्रास्त : ०३:०४, ऑक्टोबर १४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : दशमी – ०९:०८ पर्यंत पापांकुशा स्मार्त एकादशी ०९:०८ पासुन
नक्षत्र : धनिष्ठा – ०२:५१, ऑक्टोबर १४ पर्यंत
योग : शूल – २१:२६ पर्यंत
करण : गर – ०९:०८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – १९:५९ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मकर – १५:४४ पर्यंत
राहुकाल : १६:४९ ते १८:१७
गुलिक काल : १५:२१ ते १६:४९
यमगण्ड : १२:२४ ते १३:५३
अभिजितमुहूर्त : १२:०१ ते १२:४८
दुर्मुहूर्त : १६:४३ ते १७:३०
अमृत काल : १७:०९ ते १८:३९
वर्ज्य : ०८:११ ते ०९:४१
वर्ज्य : ०९:१५ ते १०:४८

आपत्ती सांगून येत नाही असे म्हणतात. साधारण सवयी किंवा चुकादेखील आपत्तीला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे मानवनिर्मिती आपत्ती टाळण्यासाठी पहिली अट आहे. नैसर्गिक आपत्ती अचानक समोर उभी रहात असल्याने प्रत्येक प्रकारच्या आपत्तीचा विचार करून त्यावेळच्या नियोजनाची आधीच कल्पना केल्यास प्रतिसाद चटकन देता येतो आणि हानी कमी होते.

नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीत बऱ्याचदा जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी असली तर ही हानी कमी करता येते. शिवाय योग्य खबरदारी आणि जनजागृतीच्या माध्यमातून मानवनिर्मित आपत्ती टाळतादेखील येते.

जागतिक स्तरावर आपत्ती विषय जागृती निर्माण करण्यासाठी आणि ती टाळण्याच्या कार्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने १९८९ पासून जागतिक आपत्ती निवारण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १३ ऑक्टोबरला आपत्ती विषयक विविध पैलूंवर चर्चा करण्यात येते.

  • आज आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे

| इक लड़की भीगी भागी सी |
सोती रातो मे जागी सी
मिली इक अजनबी से, कोई आगे ना पिछे
तुम ही कहो ये कोई बात है
इक लड़की भीगी भागी सी
सोती रातो मे जागी सी

भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही. ६० च्या दशकातील देवआनंद पासून ते ८० च्या दशकातील अनिल कपूर पर्यंत अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे.
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.

बॉम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट “शिकारी” (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना “जिद्दी” (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते “मरने की दुआएँ क्यों मांगूँ”. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्याच संधी मिळाल्या. त्यांनंतर त्यांनी अनेक गुजराती, बंगाली, तसेच मराठी गाणी देखील गायली.

इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शो करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शो हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरीही किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.

1987: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, अभिनेता, आभासकुमार गांगुली ऊर्फ किशोरकुमार यांचे निधन ( जन्म : ०४ ऑगस्ट, १९२९)

*भुलाभाई देसाई – भुलाभाईंचा जन्म बलसाडला झाला. प्राथमिक शिक्षण बलसाड येथे. १८९५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम्. ए. ही पदवी घेतली (१९०१) व अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पतकरली. तत्पूर्वी १८८२ मध्ये विद्यार्थिदशेतच इच्छाबेन या युवतीशी त्यांचे लग्न झाले.

अहमदाबादला असतानाच भुलाभाई एल्एल्. बी. झाले वे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची वकिली परीक्षा दिली (१९०५). त्यांनी मुंबईस वकिलीस सुरुवात केली व अल्पावधीतच तज्ञ वकील म्हणून नाव मिळविले. तसेच देसाई काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते

पुढे मुंबई राज्यात ते ॲडव्होकेट जनरल झाले. त्यांनी पुढे होमरूलच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींच्या असहकारीतेच्या चळवळीपासून ते बदलू लागले. १९२५ साली ते ब्रूमफिल्ड समितीपुढे बार्डोलीच्या शेतकऱ्यांतर्फे उभे राहिले.

१९३१ साली गांधी-आयर्विन कराराप्रमाणे बार्डोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडली. १९३२ साली त्यांना कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल एक वर्ष शिक्षा व १०,००० रु. दंड झाला.
तुरुंगात त्यांची प्रकृती ढासळली व सुटका झाल्यावर ते वकिलीच्या काही कामानिमित्त इंग्लंडला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी काँग्रेसतर्फे पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्याचा प्रयत्न केला. ते त्या बोर्डाचे सचिव व पुढे अध्यक्ष झाले. ते मध्यवर्ती कायदे मंडळात गुजरातमधून निवडून आले व विरोधी पक्षाचे नेते झाले. ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे काही वर्षे सभासद होते. दुसरे महायुद्ध संपल्यावर आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जे खटले झाले, ते भुलाभाईंनी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले. त्यांत त्यांना पूर्ण यश आले.

भुलाभाईंनी लियाकत अलींबरोबर जातीय प्रश्नांबाबत एक करारही केला होता. हा देसाई-लियाकत करार अमंलात आला नाही.

काँग्रेस वर्किंग कमिटीने भुलाभाईंवर गांधीजींचा विचार न घेता हा करार केला, असा आरोप ठेवला. पुढे हंगामी (इंटरिम) मंत्रिमंडळातही भुलाभाईंचा समावेश केला नाही. शिवाय निवडणुकीसाठी त्यांचे नावही सुचविले नाही. यांमुळे अखेरच्या दिवसांत त्यांची उपेक्षा झाली. यातच ते आजारी पडले. त्यांचे मुंबईस निधन झाले. इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व, अस्खलित वक्तव्य आणि वकिलीतील अशीलाची बाजू मांडण्याची हातोटी यांमुळे ते अत्यंत लोकप्रिय होते.

१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे, १९४६)

  • घटना :

  • ५४: नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
    १७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
    १८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
    १९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.
    १९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
    १९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
    १९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
    १९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
    २०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.

• मृत्यू :

• १२४०: मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली (बहुधा एकमेव मुस्लिम महिला ) पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.
• १९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर, १८६७)
• १९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट, १९२९)
• १९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे, १९१५ )
२००१: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.

  • जन्म :
    १९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर, २००१)
    १९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च, २००२)
    १९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी, १९९६)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »