आचार्य आनंदऋषीजी महाराज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, मार्च २८, २०२४

युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र ०८, शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:५१
चंद्रोदय : २१:२९ चंद्रास्त : ०८:१४
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – १८:५६ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – १८:३८ पर्यंत
योग : हर्षण – २३:१३ पर्यंत
करण : विष्टि – १८:५६ पर्यंत
द्वितीय करण : बव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १४:१५ ते १५:४७
गुलिक काल : ०९:४० ते ११:१२
यमगण्ड : ०६:३६ ते ०८:०८
अभिजितमुहूर्त : १२:१९ ते १३:०८
दुर्मुहूर्त : १०:४१ ते ११:३०
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : ०८:५८ ते १०:४३
वर्ज्य : ००:४२, मार्च २९ ते ०२:२५, मार्च २९

॥ नमामि देवं सकलार्थदं तं सुवर्णवर्णं भुजगोपवीतम्ं।
गजाननं भास्करमेकदन्तं लम्बोदरं वारिभावसनं च॥

आज गणेश चतुर्थी आहे.

आज शिव छत्रपती जयंती आहे ( तिथी प्रमाणे )

आचार्य आनंदऋषीजी – हे एक महान जैन संत होते. यांचे मूळ नाव नेमीचंद देवीचंदजी गुगळे होते. यांच्या आईचे नाव हुलसाबाई आणि त्यांच्या मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी होते. आनंद ऋषीजी यांना श्वेतांबर जैन पंथाचे आचार्य या पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. जैन धर्मीयांमध्ये त्यांचे आदराचे आणि मानाचे स्थान आहे.

आनंदऋषीजी यांनी दहा वर्षांचे असताना जैन धर्माचा अभ्यास सुरू केला आणि वयाच्या १३व्या वर्षी, ७ डिसेंबर १९१३ रोजी (मार्गशीर्ष शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दीक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.
आनंदऋषीजींनी पुढे रतनऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्) मॄत्यूनंतर आनंदऋषीजींनी त्यांच्या गुरूशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला.

धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र मानून सुमारे ७५ वर्षे देशभर भ्रमण करून हा संदेश त्यांनी दिला.

भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे पोथ्यांत बंदिस्त होते, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आनंदऋषीजींनी केले. जैन धर्मग्रंथ आणि अन्य धर्मांची शिकवण यांची सांगड हे त्यांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अन्य धर्मांचा बारकाईने अभ्यास केला होता..त्यांच्या प्रवचनांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथमहाराजांबरोबर गुरुनानक इतकेच नाही तर महंमद पैगंबराची वचने यांचा समावेश असे; संत कबीर, तुलसीदास, नरसी मेहता यांच्या कवनांचाही उल्लेख असे.

आपलाच धर्म श्रेष्ठ्हा हेका त्यांनी कटाक्षाने टाळला. खुद्द जैन धर्मातील सर्व पंथांनी संघटितरीत्या धर्मकार्य करावे, मात्र त्याचा केंद्रबिंदू हा देशकार्याचा, सर्वसामान्यांच्या उत्थानाचाच असावा अशी त्यांची धारणा होती.

आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी ’तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डा’ची स्थापना केली. आणि याच ठिकाणी त्यांची समाधीही आहे. या जागेला आनंद धाम असेही संबोधले जाते.

• १९९२: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन. ( जन्म : २७ जुलै, १९०० )

  • घटना :
    १७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
    १८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
    १९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
    १९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.
    १९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
    १९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
    १९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

• मृत्यू :

• २०००: अर्थतज्ञ शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.
• २००६ : मराठी गायक बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) यांचे निधन . (जन्म : १९ ऑगस्ट, १९२२)

  • जन्म :
    १९२५: अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म. (मृत्यू: ०१ मार्च, १९९८)
    १९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या वीणा मजूमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे२०१३)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »