डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
आज रविवार, एप्रिल १४, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र २५, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२२ सूर्यास्त : १८:५६
चंद्रोदय : १०:५२ चंद्रास्त : ००:४९, एप्रिल १५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायन
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – ११:४३ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – ०१:३५, एप्रिल १५ पर्यंत
योग : अतिगण्ड – २३:३३ पर्यंत
करण : तैतिल – ११:४३ पर्यंत
द्वितीय करण : गर – २३:५१ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १७:२१ ते १८:५६
गुलिक काल : १५:४७ ते १७:२१
यमगण्ड : १२:३९ ते १४:१३
अभिजितमुहूर्त : १२:१४ ते १३:०४
दुर्मुहूर्त : १७:१५ ते १८:०५
अमृत काल : १५:१६ ते १६:५५
वर्ज्य : ०९:२९ ते ११:०८
महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होते.
याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.
१४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवले गेले.
१८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)
भारतासारख्या देशांमध्ये वैशाखी कापणीचा उत्सव हा नृत्य, गाणे, संगीत, उत्सवाचे कपडे परिधान आणि धार्मिक स्तुतीचा एक प्रसंग आहे. हा सण नानकशाही सौर कॅलेंडरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करतो आणि शीख धार्मिक श्रद्धा ओळखतो.
वैशाखीला बैसाखी असेही म्हणतात.
हा कापणीचा उत्सव दरवर्षी होतो आणि कापणी करणारे नवीन वर्ष आणि कापणी केलेल्या पिकांबद्दल साजरे करतात आणि आनंद करतात. तथापि, १६९९ मध्ये जेव्हा वैशाखी उत्सवादरम्यान खालसा पंथ (धार्मिक योद्धाचा प्रकार) संघटना स्थापन करण्यात आली तेव्हा या उत्सवाला आणखी एक अर्थ प्राप्त झाला.
१० व्या गुरू गोविंद सिंग यांनी विचारले की हजारोंच्या जमावात कोण धर्मासाठी मरण्यास तयार आहे. अखेरीस पाच जणांनी स्वेच्छेने आपला जीव दिला. पण गुरु गोविंद सिंग यांनी त्या माणसांना मारले नाही. त्याऐवजी त्याने त्यांचा बाप्तिस्मा केला आणि पुरुष खालसा नावाच्या गटाचे पहिले पाच सदस्य बनले. वैशाखी उत्सवादरम्यान शीख बाप्तिस्मा घेण्याची परंपरा या ऐतिहासिक घटनेपासून उद्भवली.
शीख धर्मीयांसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. अनेक शीख या सुट्टीमध्ये बाप्तिस्मा घेण्याचे निवडतात. वैशाखी उत्सवादरम्यान, नगर कीर्तन नावाच्या मिरवणुकाही गुरू ग्रंथ साहिब नावाच्या पवित्र ग्रंथातील भजन गात रस्त्यावरून मार्गक्रमण करतात.
तसेच मेषा संक्रांती, ज्याला पश्चिम बंगालमध्ये नबा वर्षा, नोबोबोर्शो किंवा पोइला बैशाख म्हणूनही ओळखले जाते, बंगाली कॅलेंडरची सुरुवात होते आणि म्हणूनच बंगाली नववर्ष म्हणून साजरे केले जाते. हा कार्यक्रम पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर आसाम, त्रिपुरा आणि बांगलादेशातील बंगाली लोकसंख्येचा समावेश आहे. आसाममध्ये पोइला बैशाखला बिहू किंवा आसामी नववर्ष म्हणून ओळखले जाते.
आज पोहेला वैशाख म्हणजेच बंगाल नववर्ष / वैशाखी सण आहे.
सर्वांना वैशाखी सणाच्या शुभेच्छा
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
त्यांना श्रध्दांजली म्हणून तसेच अग्नी पासून बचाव करण्यासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस भारतीय अग्निशमन दिवस मानला जातो.
आज भारतीय अग्निशमन दिवस आहे.
आधुनिक भारतीय संत व तत्त्वज्ञ. रमण महर्षी –
‘मनात असलेल्या बेड्या तोडल्याशिवाय मानवाचा जीवनविकास होणार नाही’, असा साधा-सोपा-सरळ उपदेश त्यांनी केला.
तिरुवन्नामलईच्या अरुणाचलेश्वराच्या मंदिरामध्ये, पाताळलिंगम् गुहेत आणि अशा अनेक ठिकाणी रमण महर्षी ध्यानस्थ बसत. ध्यानाच्या दरम्यान त्यांना कशाचेही भान राहत नसे. डास, मुंग्या इत्यादींच्या त्रासातही त्यांनी साधना केली.
मुलांचा व साधुवेषातील भोंदूंचाही त्रास त्यांनी सहन केला. परंतु पळणीस्वामी, मौनी साधू, शेषाद्रिस्वामी इत्यादींनी त्यांची सेवा-सुश्रुषा केली. अकरा वर्षांच्या मौनानंतर ते मोजके बोलू लागले. लोक त्यांना ‘मौनीसाधू’ म्हणत. आपले प्रश्न विचारत. त्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत.
लोकांना त्यांच्या उत्तरातून प्रेरणा आणि जगण्याचे बळ मिळत गेले म्हणून लोक त्यांच्याकडे येत गेले आणि हळूहळू तेथे ‘रमणाश्रम’ तयार झाला. त्यांची आईही १९१६ साली आश्रमात येऊन राहिली. धाकटा भाऊही संन्यास घेऊन तेथे आला. आईच्या निधनानंतर त्यांनी आश्रमाजवळ ‘मातृभूतेश्वर’ मंदिराची स्थापना केली. त्यांचे साधे-सोपे व व्यावहारिक तत्त्वज्ञान सर्वांना आवडत होते. ते आता केवळ वेंकटरमण न राहता रमण महर्षी झाले.
कर्मभूमी अरुणाचलला उद्देशून त्यांनी सूक्ते रचली. त्यांचे श्रीसद्दर्शन, रमणगीता, उपदेशसार आणि रमणोपनिषद इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पॉल ब्रंटन यांनी आपल्या इन सर्च ऑफ सीक्रेट इंडिया, द सीक्रेट पाथ आणि मेसेज फ्रॉम अरुणाचल या पुस्तकांमध्ये महर्षींचे विचार आणि त्यांचे जीवन यांविषयी सुंदर मांडणी केलेली आहे. आर्थर ओस्बोर्न यांनी संपादित केलेल्या द कलेक्टेड वर्क्स ऑफ रमण महर्षी या ग्रंथात महर्षींचे विचार त्यांच्याच शब्दात इंग्रजी भाषेत व्यक्त केलेले आहेत.
१९५० : भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचे निधन ( जन्म : ३० डिसेंबर , १८७९ )
- घटना :
१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
• मृत्यू :
• १९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर, १८७९)
• १९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: १५ सप्टेंबर, १८६१)
• १९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९३)
• १९९७: चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.
• २०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: १ मार्च, १९३०)
- जन्म :
१९०० : महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचा जन्म ( मृत्यू : २५ जुलै, १९७७ )
१९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै , १९९२)
१९१९: पार्श्वगायिका पद्मभूषण शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल, २०१३)
१९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर , १९७५)
१९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक पद्मभूषण पुरस्कार सन्मानित उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १९ अप्रैल, २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)
१९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.
१९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.
१९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.