आजचा दिवस
सोमवार, ऑक्टोबर ३०, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक कार्तिक शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:०६
चंद्रोदय : १९:१६ चंद्रास्त : ०७:५५
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – २२:२२ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – ०४:०१, ऑक्टोबर ३१ पर्यंत
योग : व्यतीपात – १७:३३ पर्यंत
करण : तैतिल – ११:०३ पर्यंत
द्वितीय करण : गर – २२:२२ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : मेष – १०:२८ पर्यंत
राहुकाल : ०८:०४ ते ०९:३०
गुलिक काल : १३:४८ ते १५:१४
यमगण्ड : १०:५६ ते १२:२२
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : १२:४५ ते १३:३१
दुर्मुहूर्त : १५:०३ ते १५:४९
अमृत काल : ०१:४१, ऑक्टोबर ३१ ते ०३:१४, ऑक्टोबर ३१
वर्ज्य : १६:२१ ते १७:५५
श्रीराम जन्म भूमी मुक्ती आंदोलनास अयोध्या येथे कार सेवेने प्रारंभ झाला
३० ऑक्टोबर १९९० व २ नोव्हेंबर १९९० रोजी अनेक कार सेवक गोळीबारात मृत्युमुखी पडले तसेच जखमी झाले.
अनेक वर्षांच्या संघर्षातून ५ ऑगस्ट, २०२० रोजी भूमिपूजनाने श्री राम मंदिर उभारणीस सुरवात झाली आहे . लवकरच २२ जानेवारी २०२४ मध्ये रीतसर पूजन होऊन लोकार्पण होणार आहे.
मलिका-ए-गझल – भारतीय शास्त्रीय गायिका तसेच गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर – वयाच्या सातव्या वा आठव्या वर्षापासून अख्तरीबाईंचे संगीतशिक्षण सुरू झाले. सारंगीवादक इमाद खॉं हे त्यांचे पहिले गुरू होते.
त्यांच्याकडील अख्तरीबाईंचे शिक्षण सहा महिन्यांतच संपुष्टात आले. त्यांचे नंतरचे शिक्षण पतियाळा घराण्याच्या अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडे सुरू झाले. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे शिष्य गुरूकडे राहून शिकत असत. पण अख्तरीबाईंचे गाणे ऐकून ते त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्यास तयार झाले. अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडून अख्तरीबाईंना ख्यालगायकीचे शिक्षण मिळाले. पण त्यांचा कल शास्त्रीय गायकीपेक्षा ठुमरी, दादरा आणि गझल ह्यांत आहे हे लक्षात आल्यावर तसे शिक्षण त्यांना देण्याविषयी अता मोहोम्मद खॉं ह्यांनी मुश्तरीबाई ह्यांना सुचवले.
१९३४ साली कोलकाता येथील आल्फ्रेड थिएटर येथे बिहारच्या भूकंपग्रस्तांसाठी निधी जमवण्यासाठी आयोजित केलेल्या संगीतमहोत्सवात महत्त्वाचे गायक न आल्याने अख्तरीबाईंना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांना लोकांची चांगली दाद मिळाली.
नंतर अख्तरीबाईंना नाटकांत तसेच चित्रपटांत अभिनय करण्याची संधी मिळाली.
एक दिन का बादशाह (१९३३), नलदमयंती (१९३३), मुमताझ बेगम (१९३४), अमीना (१९३५), नसीब का चक्कर (१९३५), आणि जवानी का नशा (१९३५) अशा विविध चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
मेगाफोन कंपनीने अख्तरीबाईंच्या ध्वनिमुद्रिका १९३३ पासून काढल्या असल्या तरी १९३८च्या दीवाना बनाना है तो दीवाना बना दे ह्या गझलेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. चित्रपटकारकीर्दीमुळे अख्तरीबाईंच्या संगीतशिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा संगीतशिक्षण घेण्याचे ठरवले. किराणा घराण्याच्या उस्ताद अब्दुल वहीद खॉं ह्यांच्याकडे शिक्षण घ्यायला प्रारंभ केला.
ह्याच काळात अख्तरीबाईंच्या गाण्याला विविध संस्थानांतील संस्थानिकांकडून दाद मिळू लागली. १९४४मध्ये अख्तरीबाईंनी लखनौमधील बॅरिस्टर इश्तियाक अहमद अब्बासी ह्यांच्याशी विवाह केला. त्यायोगे त्यांना हवी असलेली सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळाली. १९४८मध्ये अख्तरीबाईंना लखनौमध्ये ऑल इंडिया रेडियोवर गाण्याची संधी मिळाली. लवकरच त्या रेडियोवर गायिका म्हणून अ-दर्जा मिळाला.
त्यांचा संगीत-नाटक-अकादमी-पुरस्कार देऊन सन्मान केला. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला.
१९७४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर, १९१४)
सुकुमार रॉय हे बंगाली बाललेखक आणि भारतीय साहित्यातील “मूर्ख कविता” चे प्रणेते होते. ते एकाच वेळी लेखक, कवी, बाल लेखक, विनोदी लेखक, निबंधकार, नाटककार आणि संपादक आहे. ते लोकप्रिय बाल लेखक उपेंद्रकिशोर रॉयचौधरी आणि त्यांचे पुत्र सत्यजित राय, एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते होते. अबोल तबोल, गलपा हा-या-बा-आरएल, कथासंग्रह पगला दाशू, आणि नाटक चालचित्ताचारी यांची त्यांची कवितेची पुस्तके जागतिक साहित्यातील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट “बकवास” उपहासात्मक बालसाहित्य मानली जातात, फक्त काही मूठभर अॅलिस इन वंडरलँड सारखे शास्त्रीय साहित्य. त्यांच्याशी समतुल्य. त्यांच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे झाली, तरीही ते बंगाली साहित्यातील सर्वात लोकप्रिय बाल लेखकांपैकी एक आहेत.
१८८७: बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर, १९२३)
घटना :
१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
१९९५: कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.
२०२२ : २० फेब्रुवारी , १८७९ पासून वापरात असणाऱ्या गुजरातमधील मोरबी येथील झुलता पूल दुर्घटनेत सुमारे १३५ नागरिकांचा मृत्यू झाला.
• मृत्यू :
• १८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी, १८२४)
• १९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर, १९०१)
• १९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी , १९४५)
• १९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट, १९०७)
• १९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर, १९२६)
• १९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट, १९०६)
• २००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
• २०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)
जन्म :
१९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी, १९६६)
१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै , २०१३)
१९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे, २००६)
१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.