स्वामी समर्थ प्रगट दिन
आज बुधवार, एप्रिल १०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र २१, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:५५
चंद्रोदय : ०७:२३ चंद्रास्त : २०:४४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायन
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १७:३२ पर्यंत
नक्षत्र : भरणी – ०३:०५, एप्रिल ११ पर्यंत
योग : विष्कम्भ – १०:३८ पर्यंत
करण : बालव – ०६:५८ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १७:३२ पर्यंत
क्षय करण : तैतिल – ०४:१३, एप्रिल ११ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १२:४० ते १४:१३
गुलिक काल : ११:०६ ते १२:४०
यमगण्ड : ०७:५९ ते ०९:३२
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१५ ते १३:०५
अमृत काल : २२:४२ ते ००:१०, एप्रिल ११
वर्ज्य : १३:५४ ते १५:२२
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात.
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्याच भक्तांची श्रद्धा आहे. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
आज अक्कलकोट – स्वामी समर्थ प्रगट दिन आहे.
चेटीचंड हा सिंधीभाषक बांधवांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे.
आज संत झुलेलाल जयंती तसेच सिंधी बांधवांचा नववर्ष दिन आहे.
आज जागतिक होमिओपॅथी दिन आहे.
आज विश्व भावंड दिन आहे.
• १९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
• अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया॥२॥
१९३१: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचा जन्म. ( मृत्यू: एप्रिल ३, २०१७)
सुप्रसिद्ध भारतीय पुरावनस्पतिविज्ञ व भारतीय वनस्पतिविज्ञान परिषदेचे संस्थापक.- खगोलशास्त्रज्ञ – मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा* : त्यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या भेडा या गावी. वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांना योग्य शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली.
वडिलांसोबत हिमालय व इतर ठिकाणच्या सहली करताना त्यांना वनस्पती, खडक, जीवाश्म यांचा संग्रह करण्याचा छंद जडला. त्यांच्या या छंदाला स्वीडिश शास्त्रज्ञ स्व्हेन आंडर्स हेडीन यांच्यामुळे अधिक गती व प्रेरणा मिळाली. बिरबल सहानी यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या मिशन अँड सेंट्रल मॉडेल स्कूल्स येथे व महाविदयालयीन शिक्षण तेथीलच शासकीय महाविदयालयात झाले.
१९११ साली त्यांनी पंजाब विदयापीठाची बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विदयापीठाचा ट्रायपॉस मिळविला. ह्या विदयापीठात ए.सी. सीवर्ड यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी जीवाश्मवनस्पतिविज्ञानाविषयी ( प्राचीन जीवाश्म -शिळारूप – वनस्पतींच्या संबंधी ) बरेच मौलिक संशोधन केले. त्यांच्या वनस्पती जीवाश्मांवरील संशोधनासाठी लंडन विदयापीठाने डी.एस्सी. ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले (१९१९). केंब्रिज विदयापीठातून एस्सी.डी. ही पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते (१९२९).
भारतात परतल्यावर पंजाब विदयापीठात प्राध्यापक व बनारस विदयापीठात वनस्पतिविज्ञानाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. १९२१ मध्ये नवीनच स्थापन झालेल्या लखनौ विदयापीठातही ते वनस्पतिविज्ञानाचे विभागप्रमुख होते. पुरावनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासासाठी भूविज्ञानाचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लखनौ विदयापीठात भूविज्ञान विभाग स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले (१९४३). याच विदयापीठाच्या विज्ञानशाखेचे ते कित्येक वर्षे अधिष्ठाता होते. सदर विदयापीठात त्यांनी वनस्पतींच्या जीवाश्मांचा मोठा संग्रह केला होता.
इंडियन सायन्स काँगेसच्या वनस्पतिविज्ञान विभागाचे १९२१ व १९३८ ह्या वर्षी व १९२६ साली भूविज्ञान विभागाचे ते अध्यक्ष होते. पॅरिस येथे १९३५ साली झालेल्या नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या तृतीय दशवार्षिक समारंभासाठी आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनाच पाठविण्यात आले होते.
१९३६ साली लंडनच्या रॉयल सोसायटीचे अधिछात्र होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. १९३७-३८ मध्ये ते नॅशनल अॅकॅडेमी ऑफ सायन्सचे अध्यक्ष होते व १९४० साली इंडियन सायन्स काँगेसचे अध्यक्ष झाले. नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ सायन्सचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. बर्कले व सी. आर्. रेड्डी पारितोषिकांचे ते मानकरी ठरले (१९४७)
१९५० साली झालेल्या आंतरराष्ट्रीय वनस्पतिविज्ञान परिषदेकरिता त्यांची सन्माननीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती; परंतु सदर परिषद होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)
भारतीय संपादक , पत्रकार, उदारमतवादी राजकारणी आणि संसदपटू सर चिररावूरी यज्ञेश्वरा चिंतामणी. – त्यांचा जन्म तेलुगू नववर्षाच्या दिवशी (उगदी) विजयनगरम , आंध्र प्रदेश , भारत येथे झाला .
प्रख्यात भारतीय राजकारणी श्री व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री यांनी त्यांना “भारतीय पत्रकारितेचे पोप” म्हटले होते .
१८ व्या वर्षी ते विझाग स्पेक्टेटर या वृत्तपत्राचे संपादक झाले . त्यावेळी त्यांनी कागद विकत घेतला आणि त्याचे नाव इंडियन हेराल्ड ठेवले . त्यांनी जी सुब्रमणिया अय्यर यांच्या संपादनाखाली मद्रास स्टँडर्डमध्ये काम केले .
१९०९ ते १९३४ दरम्यान ते अलाहाबादस्थित द लीडरचे मुख्य संपादक होते. संपादक म्हणून स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून संचालक मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याशी त्यांचा संघर्ष म्हणजे मोतीलाल एका वर्षाच्या आत, त्यानंतर १९२७ ते १९३६ दरम्यान निघून गेले. , चिंतामणी हे केवळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक नव्हते तर उत्तर प्रदेश विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते .
चिंतामणी यांची ब्रिटिश भारतातील संयुक्त प्रांतांचे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती भारत सरकार कायदा 1919 च्या राजसत्ता योजनेचा एक भाग म्हणून करण्यात आली होती . 1930-1931 मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेसाठी त्यांना प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
महात्मा गांधी आणि ब्रिटीश प्रशासक आणि भारतीय लोक त्यांच्या संपादकीयांमुळे खूप प्रेरित झाले. 1939 च्या बर्थडे ऑनर्स यादीत त्यांना नाइट देण्यात आले; 20 सप्टेंबर रोजी जॉर्ज सहावा यांनी त्यांना नाइटहुड प्रदान केला.
१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै, १९४१)
- घटना :
१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
• मृत्यू :
• १३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले. ( तारखेनुर )
• १९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)
• १९४९ : पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन ( जन्म : १४ नोव्हेंबर, १८९१ )
• १९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर, १८९८)
• २०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै, १९१८)
- जन्म :
१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून , १९०१)
१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)
१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)
१९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७१)
१९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी, १९९५)
१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे , २०१३)
१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.
१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.
आपला दिवस मंगलमय जावो.