जालियनवाला बाग हत्याकांड
आज शनिवार, एप्रिल १३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र २४, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५५
चंद्रोदय : ०९:५५ चंद्रास्त : २३:५४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायन
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – १२:०४ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – ००:४९, एप्रिल १४ पर्यंत
योग : शोभन – ००:३४, एप्रिल १४ पर्यंत
करण : बालव – १२:०४ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २३:४७ पर्यंत
सूर्य राशि : मीन – २१:१५ पर्यंत
चंद्र राशि : वृषभ – १२:४४ पर्यंत
राहुकाल : ०९:३१ ते ११:०५
गुलिक काल : ०६:२३ ते ०७:५७
यमगण्ड : १४:१३ ते १५:४७
अभिजितमुहूर्त : १२:१४ ते १३:०४
दुर्मुहूर्त : ०६:२३ ते ०७:१३
दुर्मुहूर्त : ०७:१३ ते ०८:०३
अमृत काल : १६:०२ ते १७:३८
वर्ज्य : ०६:२६ ते ०८:०२
१३ एप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.
या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.
१९१९ : आज जालियनवाला बाग हत्याकांड दिवस आहे.
ऐ मेरी ज़ोहरा-ज़बीं
तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसीं
और मैं जवाँ
तुझपे क़ुरबान मेरी जान मेरी जान
ऐ मेरी …
बलराज साहनी – यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.
पुढे १९३० साली ते पत्नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.
२५ वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीत १२५ चित्रपटातून काम केले. बिमल रॉय यांचा ” दो बिघा जमीन ” अमिया चक्रवर्ती यांचा “सीमा” , राजेंद्र सिंह बेदी यांचा “गरम कोट” कथेवरीळ चित्रपट, तसेच कबुलीवाला, वक्त – त्यातील गाणे , यातील अभिनय अविसमरणीय आहे.
एम एस सॅथ्यु यांचा “गरम हवा” यात त्यांनी केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्यास नकार नकार येणाऱ्या पात्राची वठवलेली भूमिका प्रेक्षक विसरू शकले नाहीत.
‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (आय.पी.टी.ए.) व ‘पंजाबी कला केंद्राचे’ ते संस्थापक सदस्य होते.
बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.
१९७३: पुरस्कार सन्मानित अभिनेते दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे , १९१३)
दादासाहेब तोरणे चित्रपटवितरक – भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. ‘श्री पुंडलिक’ हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेबांनी घेतला.
त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी ‘बोर्न अँड शेफर्ड’ कंपनीच्या मुंबई कार्यालयातून ‘विल्यमसन कायनेमॅटोग्राफ’ हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून ‘श्री पुंडलिक’चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली.
असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट ‘श्री पुंडलिक’, सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील ‘कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ’ या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेषम्हणचे ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही
. ‘श्री पुंडलिक’ चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी.
मराठी ‘शामसुंदर’ मुंबईच्या ‘वेस्ट ऍन्ड’ (आताचा ‘नाझ’) मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील ‘प्रभात स्टुडिओ’चे ‘अयोध्येचा राजा’ आणि ‘अग्निकंकण’ हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले.
दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली.
ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. त्यानंतर दादासाहेबांनी चित्रपटक्षेत्राला कायमचाच रामराम ठोकला. १९ जानेवारी १९६० रोजी या महान कलाकाराने आपली जीवनयात्रा संपविली.
१८९० : चित्रपट निर्माते , वितरक दादासाहेब तोरणे यांचं जन्म ( मृत्यू : १९ जानेवारी १९६०)
- घटना :
१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
• मृत्यू :
• १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर, १८६८)
• १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर, १८९५)
• १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.
• १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.
• २०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.
• २००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट , १९३० )
- जन्म :
१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे पद्मभूषण वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर , १९७८)
१९४०: राज्यसभा सदस्य डॉ. नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.
१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म. ( मृत्यू: ९ मार्च, २०२३ )