स्कंदमाता
आज सोमवार, ऑक्टोबर ७, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १५ शके १९४५
सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२२
चंद्रोदय : १०:०८ चंद्रास्त : २१:१५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतू : शरद्
चंद्र माह : आश्विज
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्थी – ०९:४७ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ०२:२५, ऑक्टोबर ०८ पर्यंत
योग: प्रीति – ०६:४० पर्यंत
करण : विष्टि – ०९:४७ पर्यंत
द्वितीय करण : बव – २२:३६ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : ०७:५९ ते ०९:२८
गुलिक काल : १३:५५ ते १५:२४
यमगण्ड : १०:५७ ते १२:२६
अभिजित मुहूर्त : १२:०२ ते १२:५०
दुर्मुहूर्त : १२:५० ते १३:३७
दुर्मुहूर्त : १५:१२ ते १५:५९
अमृत काल : १५:०३ ते १६:४८
नवरात्र (पाचवी माळ) – दिवस ५ – स्कंदमाता
स्कंदमाता ही पंचमी (पाचव्या दिवशी) पूजली जाणारी देवी, स्कंद (किंवा कार्तिकेय)ची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते. ती एका भयंकर सिंहावर स्वार होत, चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे.
त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना- या परिस्थितीचे नेमके कारण म्हणजे एक रहस्य आहे. हे ट्रिगेमनिनल मज्जातला चिडण्यामुळे, कधीकधी रक्तवाहिन्याद्वारे किंवा मेंदूमध्ये सूजाने होऊ शकते. तथापि, ट्रिगेमाइनल मज्जातंतूच्या शस्त्रक्रियेची अंतर्गत काही प्रकरणे मस्तिष्क मधील संरचनांना प्रभावित करणार्या विकारांशी संबंधित आहेत, जसे की मल्टीपल स्केलेरोसिस. एकदा एखाद्या व्यक्तीला ट्युगेलिनल मज्जातंतुवेतन झाल्यानंतर गाल किंवा जबड्याने किंवा कंपनाने (जसे की इलेक्ट्रिक टूथब्रश) संपर्क करून वेदना होऊ शकते. तथापि, एखाद्या व्यक्तीस चेहर्याचा अस्वस्थता किंवा अॅनिटॅकच्या काही दिवस आधी झुक्का वाजू शकते.
आज आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन आहे
॥ एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें दीर्ध जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी॥
॥ अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी फुंक मारीता जिला जबरी कोण तुतारी ती मज देईल?॥
॥ रुढी,जुलूम यांची भेसूर संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला जल्शाची का?पुसा मनाला! तुतारीने या सावध व्हा तर!॥
१८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
“बोले सो निहाल, सत श्री अकाल” – १६७५ मध्ये श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला. त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंहजी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु गादीवर विराजमान झाले. धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली. गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या.
माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते.
गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.
समाजबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी पाच ककारांची निर्मिती त्यांनी केली. ककार मानणार्यास खालसा पंथाचे मानले जाते. ककार व त्यांची वैशिष्ट्ये- १) केस (हे केस कधीच कापायचे नाहीत.) २) कडे (स्टीलचे) ३) कंगवा (लाकडापासून बनलेला) ४)कच्छा कच्छा म्हणजे एक प्रकारची सूती विजार. ही विजार मात्र गुडग्यापेक्षा खाली नसावी. युध्दाच्या काळात घोडदौडीच्या वेळी हिचा उपयोग होत असे. ५) कृपाण (एक प्रकारचा चाकू). गुरु गोविंद सिंहजी यांनी ४२ वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. १७०८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.
- १७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)
पद्मभूषण पुरस्कार सन्मानित गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तरवयाच्या सातव्या वा आठव्या वर्षापासून अख्तरीबाईंचे संगीतशिक्षण सुरू झाले. सारंगीवादक इमाद खॉं हे त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडील अख्तरीबाईंचे शिक्षण सहा महिन्यांतच संपुष्टात आले. त्यांचे नंतरचे शिक्षण पतियाळा घराण्याच्या अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडे सुरू झाले. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे शिष्य गुरूकडे राहून शिकत असत. पण अख्तरीबाईंचे गाणे ऐकून ते त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्यास तयार झाले. अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडून अख्तरीबाईंना ख्यालगायकीचे शिक्षण मिळाले. पण त्यांचा कल शास्त्रीय गायकीपेक्षा ठुमरी, दादरा आणि गझल ह्यांत आहे हे लक्षात आल्यावर तसे शिक्षण त्यांना देण्याविषयी अता मोहोम्मद खॉं ह्यांनी मुश्तरीबाई ह्यांना सुचवले.
१९३४ साली कोलकाता येथील आल्फ्रेड थिएटर येथे बिहारच्या भूकंपग्रस्तांसाठी निधी जमवण्यासाठी आयोजित केलेल्या संगीतमहोत्सवात महत्त्वाचे गायक न आल्याने अख्तरीबाईंना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांना लोकांची चांगली दाद मिळाली. नंतर अख्तरीबाईंना नाटकांत तसेच चित्रपटांत अभिनय करण्याची संधी मिळाली. एक दिन का बादशाह (१९३३), नलदमयंती (१९३३), मुमताझ बेगम (१९३४), अमीना (१९३५), नसीब का चक्कर (१९३५), आणि जवानी का नशा (१९३५) अशा विविध चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
मेगाफोन कंपनीने अख्तरीबाईंच्या ध्वनिमुद्रिका १९३३ पासून काढल्या असल्या तरी १९३८ च्या दीवाना बनाना है तो दीवाना बना दे ह्या गझलेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. चित्रपटकारकिर्दीमुळे अख्तरीबाईंच्या संगीतशिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा संगीतशिक्षण घेण्याचे ठरवले. किराणा घराण्याच्या उस्ताद अब्दुल वहीद खॉं ह्यांच्याकडे शिक्षण घ्यायला प्रारंभ केला.
ह्याच काळात अख्तरीबाईंच्या गाण्याला विविध संस्थानांतील संस्थानिकांकडून दाद मिळू लागली. १९४४मध्ये अख्तरीबाईंनी लखनौमधील बॅरिस्टर इश्तियाक अहमद अब्बासी ह्यांच्याशी विवाह केला. त्यायोगे त्यांना हवी असलेली सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळाली. १९४८मध्ये अख्तरीबाईंना लखनौमध्ये ऑल इंडिया रेडियोवर गाण्याची संधी मिळाली. लवकरच त्या रेडियोवर गायिका म्हणून अ-दर्जा मिळाला. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गझलगायकीमुळे मलिका-ए-गझल म्हणण्यात येत असे. त्यांना संगीत-नाटक-अकादमी-पुरस्कार, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुस्कार लाभले होते.
- १९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका मल्लिका-ए-ग़ज़ल, पद्म भूषण बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)
घटना :
ख्रिस्त पूर्व ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.
१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
१९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.
१९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.
१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.
१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.
२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
मृत्यू :
- १९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)
- १९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.
- १९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२९)
जन्म :
- १९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)
- १९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका मल्लिका-ए-ग़ज़ल, पद्म भूषण बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)
- १९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे, २०१०)
- १९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.
- १९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.