आज विजयादशमी
आज शनिवार, ऑक्टोबर १२, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २० शके १९४५
सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१८
चंद्रोदय : १४:३८ चंद्रास्त : ०२:०२, ऑक्टोबर १३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतू : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – १०:५८ पर्यंत
नक्षत्र : श्रवण – ०४:२७, ऑक्टोबर १३ पर्यंत
योग : धृति – ००:२२, ऑक्टोबर १३ पर्यंत
करण : कौलव – १०:५८ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २२:०८ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मकर
राहुकाल : ०९:२८ ते १०:५६
गुलिक काल : ०६:३२ ते ०८:००
यमगण्ड : १३:५३ ते १५:२१
अभिजित मुहूर्त : १२:०१ ते १२:४८
दुर्मुहूर्त : ०६:३२ ते ०७:१९
दुर्मुहूर्त : ०७:१९ ते ०८:०६
अमृत काल : १८:२८ ते २०:०१
वर्ज्य : ०९:१५ ते १०:४८
आज विजया दशमी आहे.
“विजया दशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
१९२५ : ।।परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् | समर्था भवत्वाशिषा ते भृशम्।।
राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात. फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.
पूर्णवेळ संघकार्य करणार्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणार्यांना प्रचारक म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. अनेक जण आजीवन प्रचारक देखील असतात. तसेच अशा ज्ञात अज्ञात लाखो स्वयंसेवकांचे सहभागातून संघ कार्य आज केवळ देशातच नव्हे तर विदेशातही मोठ्या प्रमाणावर वृंध्दींगत होत आहे
१९२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना (२७ सप्टेंबर इ.स. १९२५) रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर येथे केली.
बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो.
विसाव्या शतकात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५,००,०००० अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे.
१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. (इंग्रजी तारीख १४ ऑक्टोबर, १९५६)
श्रीमन्मध्वाचार्य हे थोर्भ हिंदू भक्तिसंप्रदाय उद्धारक होते. ते पूर्णप्रज्ञ होते असे मानले जाते. त्यांचा जन्म उडुपीपासून जवळ असलेल्या पाजक नावाच्या गावी विजयादशमीच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मध्यगेह व आईचे नाव वेदवती असे होते. त्यांनी अनेक वेळा भारताचा दौरा केला, बंगाल, वाराणसी, द्वारका, गोवा आणि कन्याकुमारी या ठिकाणांना भेटी दिल्या. मुक्ती, भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते, असे मध्वाचार्य यांनी प्रतिपादन केले. माधवाने उपनिषदांचा आणि अद्वैत साहित्याचा अभ्यास केला, परंतु मानवी आत्मा आणि देव यांच्या एकत्वाच्या अद्वैतवादाच्या तत्त्वज्ञानावर ते सहमत नव्हते, त्याचे त्याच्या गुरूशी वारंवार मतभेद होत असत.
इ.स. १२८५ मध्ये द्वारका गुजरात मधून मिळवलेल्या मुर्तीसह उडुपी येथे कृष्ण मठाची स्थापना केली. मन्मध्वाचार्ययांनी द्वैतमताच्या प्रचारासाठी आठ मठांची स्थापना केली. यात उत्तरादी मठ हा मुख्य असून तो स्वतंत्र मठ आहे. हिंदू धर्मप्रसारासाठी व मतप्रचाराठी हा मठ कार्यरत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या द्वैत विद्यालयाचा वैष्णव धर्मावर प्रभाव पडला, मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळ, आणि अद्वैत वेदांत आणि विशिष्टाद्वैत वेदांतासह तीन प्रभावशाली वेदांत तत्त्वज्ञानांपैकी एक आहे. द्वैतवादाच्या आवारावर आधारित स्वतःची द्वैत चळवळ सुरू केली – मानवी आत्मा आणि देव (विष्णू म्हणून) या दोन भिन्न गोष्टी आहेत असे प्रतिपादन केले.
७९ वर्षी मध्वाचार्य वैकुंठवासी झाल्यावर माध्य-वैष्णव-पीठाचे आधिपत्य त्यांचे साक्षात शिष्य पद्मनामतीर्थ, नरहरीतीर्थ, माधवतीर्थ व अक्षोभ्यतीर्थ यांनी एकामागून एक याप्रमाणे केले. अक्षोभ्यतीर्थांनंतर त्यांचे शिष्य जयतीर्थ पीठावर आले. मध्वाचार्यांच्या ब्रम्हसूत्र-भाष्यावरील तत्त्वप्रकाशिका ही जयतीर्थांची टीका विशेष मान्यता पावलेली आहे. मध्वाचार्यांनी उडिपीमध्ये केलेल्या श्रीकृष्णमूर्तीच्या प्रतिष्ठापनेमुळे उडिपी आणि या गावचा परिसर हे सांप्रदायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. येथील मंदिरात मकरसंक्रांतीपूर्वी दहा दिवस मोठा उत्सव होत असतो.
१९१८ : दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली. बाबांच्या कृपेने आजही भक्तांना अनुभव येतो. त्यामुळे बाबांप्रती भक्तांची निष्ठा व सबुरी निर्माण होते. बाबांचे दरबारी आलेल्या भक्ताच्या सर्व व्यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्या पूर्ण करतात. कोणीही बाबांचे दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्व सामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
बाबा भक्तांना आपला ईश्वर आाराधनेचा मार्ग बदलू देत नसत. साई या शब्दाचा अर्थ ‘मालक’ असा आहे. साईबाबांसाठी हिंदू – मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “अल्ला मालिक” “श्रद्धा सबुरी” हे साईंचे बोल होते. (इंग्रजी – १५ ऑक्टोबर १९१८, साई बाबा समाधी दिन)
” नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ” असा प्रार्थना ध्वनी लाखो संघ स्वयंसेवकाच्या मुखातून नित्य नियमाने उमटत असताना राष्ट्राला ” परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं ” चा निर्धार व्यक्त केला जातो. अशा ह्या संघ प्रार्थनेचे प्रार्थनाकर संस्कृत पंडित नरहरी नारायण भिडे.
नरहरी नारायण भिडे यांचा जन्म नागपूर शहरातील. वडील पोलिस खात्यात अधिकारी. परंतु लाचारी किंवा लांगुनचालन करण्याचा स्वभाव नसल्याने ते बढतीविना खडतर आर्थिक आयुष्य जगत होते.
नरहरि भिडे यांचे बालपण त्यांच्या आजोबांच्या सान्निध्यात व देखरेखीखाली गेले. वयाच्या १२ व्या वर्षी खेळताना अपघात होऊन उजवा डोळा निकामी झाला. तरी सुद्धा हार न मानता आर्थिक ओढग्रस्त स्थिती असताना, चिमणीच्या अंधुक प्रकाशात त्यांनी अभ्यास करून B. Sc. पदवी मिळवली. B. Sc. पदवी नंतर संस्कृत विषय घेऊन एम. ए. झाले. त्यांना बहुभाषाविद म्हणावे लागेल. जर्मन भाषेतील हायर डिप्लोमा, फ्रेंच भाषेचा लोअर डिप्लोमा., राष्ट्र भाषा प्रवीण म्हणून त्यांनी आपल्या लिखाणातून त्यांचे ठिकाणी असलेल्या प्रज्ञेचा प्रत्यय करून दिला. ११९५६ साली वडिलांच्या निधनानंतर आई व बहीण पुण्यास आल्यामुळे भिडे नागपूर शहर सोडून पुण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत शिक्षक म्हणुन रुजू झाले. डेक्कन education सोसायटी च्या कोणत्याही विद्यार्थ्याला १९५६ पूर्वी सोळा वर्षात सन्मानाची शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. श्री भिडे यांच्या १३-१४ वर्षाच्या सेवा काळातील मार्गदर्शनामुळे ५ विद्यार्थी जगन्नाथ शंकरशेट व ४ विद्यार्थी बिडकर शिष्यवृत्ती मिळवून उत्तीर्ण झाले.
प्रतिवर्षी ११ वीची परीक्षा झाल्यानंतर भिडे सर विद्यार्थ्यांना घेऊन आळंदीस श्री महाराजांचे दर्शनास घेऊन जात. व विद्यार्थ्यांना तीन शपथ घेण्यास सांगत. १. धूम्रपान, २. मद्यपान ३. मांसाहार करणार नाही. आणि कोणतीही शपथ भविष्यात मोडल्यास माझ्याशी संबंध तुटेल. अभ्यासातील यशाबरोबरच भिडे यांचा वयाच्या १५ वर्षी (१९२८ मध्ये) नागपूरच्या मोहिते शाखेशी स्वयंसेवक म्हणून संबंध आला. भिडे यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि प्राविण्य या विषयी डॉ हेडगेवार यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच संघ स्थापनेपासून १९३९ पर्यंत हिंदी व मराठी देशभर ज्ञात असलेल्या संस्कृत भाषेत रचण्याची जबाबदारी भिडे यांच्यावर आली. सिंदी येथे झालेल्या बैठकीत सकाळी ११ वाजता भिडे यांना प्रार्थनेचा मसुदा आणून दिला.
त्याचे आधारावर ‘ मेघनिर्घोश ‘ वृत्तात ‘ नमस्ते सदावत्सले मातृभूमे… ‘ ही सर्वांगसुंदर संघ प्रार्थना त्यांनी निर्माण करून अद्वितीय, अविस्मरणीय, अनुपमेय कार्य केले. अत्यंत आशयघन, प्रसादपूर्ण, आणि अभिजात संस्कृत वाटावी अशी ही त्यांची सरस श्रुतिमनोहर काव्य रचना झाली. तेव्हा पासून संघस्थानावर हीच प्रार्थना ‘ प्रणाम स्थितीत ‘ म्हटली जाते. ही संघ प्रार्थना १ मे,१९४० पासून संघ स्थानावर म्हटली जाऊ लागली. ही केवळ प्रार्थनाक राहिली नाही तर प्रार्थनेला एक वेद मंत्र सामर्थ्यच प्राप्त झालेले आहे.
१९९२ : स्वतः: पूर्ण प्रसिद्धी दूर राहून विचार प्रार्थना रुपी सौंदर्याचे एक लेणे रा. स्व. संघाला प्रदान केलेले भिडे गुरुजी १२ ऑक्टोबर, १९९२ रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी विलीन झाले.
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
- गीतलेखिका शांता शेळके
१९२२: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म. शांताताईंच्या जन्म शताब्दी सांगता (मृत्यू: ६ जून, २००२)
अंग्रेजी को खत्म कर दिया जाए। मैं चाहता हूं कि अंग्रेजी का सार्वजनिक प्रयोग बंद हो, लोकभाषा के बिना लोक राज्य असंभव है। कुछ भी हो अंग्रेजी हटनी ही चाहिये, उसकी जगह कौन सी भाषाएं आती हैं यह प्रश्न नहीं है। हिन्दी और किसी भाषा के साथ आपके मन में जो आए सो करें, लेकिन अंग्रेजी तो हटना ही चाहिये और वह भी जल्दी। अंग्रेज गये तो अंग्रेजी चली जानी चाहिये।- राम मनोहर लोहिया
समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंथ्यचळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या राम मनोहर लोहिया यांचा आज स्मृतिदिन. देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्यपर्वातील आघाडीचा कार्यकर्ता. राम मनोहर लोहिया यांचे यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले. बर्लिनमधून पीएच.डी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.
१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलनादरमन्या आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत. १९५५ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९६३ पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले.
१९६७: समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१०)
घटना :
- १४९२: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.
- १८२३: स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.
- १८४७: वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.
- १८५०: अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.
- १८७१: भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
- १९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.
- १९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.
- १९६८: मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.
- १९८८: जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
- १९९८: तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.
- २०००: भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.
- २००१: संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.
- २००२: दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.
जन्म :
१९११: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९८७)
१९१८: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)
१९२१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंतराव श्रीधर टिळक यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१)
१९३५: भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.
१९४६: क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)