संकष्टी चतुर्थी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, ऑक्टोबर २०, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २८ शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३४ सूर्यास्त : १८:१२
चंद्रोदय : २०:३७ चंद्रास्त : ०९:२८
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – ०६:४६ पर्यंत
क्षय तिथि : चतुर्थी – ०४:१६, ऑक्टोबर २१ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – ०८:३१ पर्यंत
योग : व्यतीपात – १४:१२ पर्यंत
करण : विष्टि – ०६:४६ पर्यंत
द्वितीय करण : बव – १७:२६ पर्यंत
क्षय करण : बालव – ०४:१७, ऑक्टोबर २१ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १६:४५ ते १८:१२
गुलिक काल : १५:१७ ते १६:४५
यमगण्ड : १२:२३ ते १३:५०
अभिजितमुहूर्त : १२:०० ते १२:४६
दुर्मुहूर्त : १६:३९ ते १७:२५
अमृत काल : ०३:५२, ऑक्टोबर २१ ते ०५:२१, ऑक्टोबर २१
वर्ज्य : २३:२४ ते ००:५३, ऑक्टोबर २१

। गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:।
नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक:।।
। धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:।
गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम्।।

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही दाशरथी आणि करक चतुर्थी नावाने ओळखली जाते . चार्तुमासातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे .
ह्या चतुर्थीला दशरथ राजाचे स्मरण केले जाते .

उत्तर भारतात या दिवशी करवा चोथ व्रत करण्याची परंपरा आहे .

आज संकष्टी चतुर्थी आहे.

ऑस्टियोपोरोसिस हा एक हाडांचा आजार असून या आजारात हाडांच्या ठिसुळपणात वाढ होऊन त्यात फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे बोन मिनरल डेन्सिटीचा अभाव. वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कॅल्शियम कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हाडांचा मजबुतपणा कमी होऊन त्यामुळे हाडे तुटण्याची शक्यता वाढते.

आज जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन ( शरिरातील हाडांची कमजोरी ) आहे.

युगप्रवर्तक गुजराती कादंबरीकार, कवी व विचारवंत – गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी. त्यांचा जन्म नडियाद येथे नागर ब्राह्मण कुलात झाला. शिक्षण नडियाद आणि मुंबई येथे. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य हलाखीत गेले. १८७५ मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए. झाले. १८७९ ते ८३ पर्यंत त्यांचे वास्तव्य भावनगरला होते. १८८३ मध्ये ते एल्एल्. बी. झाले आणि त्यांनी १८८४ मध्ये मुंबईस आपला वकिली व्यवसाय सुरू केला; तथापि त्यात त्यांचे मन रमले नाही. वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी भरभराटीत असलेला आपला वकिली व्यवसाय सोडून ते नडियादला आले आणि त्यांनी स्वतःस साहित्यसेवेस संपूर्णपणे वाहून घेतले.

त्यांनी संस्कृतिचिंतन व साहित्यसेवा यांत आपले जीवन वेचले. विद्यापीठाच्या उच्च शिक्षणातील संस्कृताध्ययन, रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांनी केलेली धर्मजागृती, राष्ट्रीय आंदोलनामुळे निर्माण झालेली राष्ट्रीय अस्मिता व न्यायमूर्ती तेलंग (१८५०–९३) यांच्या वैचारिक प्रभावातून गोवर्धनरामांचा पिंड तयार झाला होता. गुजराती साहित्यात अढळ स्थान प्राप्त करणारी सरस्वतीचंद्र ( ४ भाग, १८८७, ९२, ९९, १९०१) ही त्यांची बृहत् कादंबरी युगप्रवर्तक मानली जाते.

लीलावतीच्या निमित्ताने त्यांनी त्यात श्रेय व प्रेय, यजमान व आतिथ्यधर्म इ. विषयांची चर्चा केली आहे. नवल ग्रंथावलि (१८९१) मध्ये नवलराम (१८३६–८८) यांच्या ग्रंथांचे संकलन आणि चरित्र आहे. दयारामनो अक्षरदेह (१९०८) मध्ये भक्तकवी दयाराम (१७७७–१८५२) याचे व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मय यांबाबतचे त्यांचे अध्ययन ग्रथित आहे. क्लासिकल पोएट्स ऑफ गुजरात (१८९४) हा त्यांचा इंग्रजी ग्रंथ आहे.

स्वतःच्या खाजगी जीवनाचे चिंतनपूर्ण सार त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या स्क्रेपबुक ह्या दैनंदिनीत आले आहे. त्यांच्या विचारधन व अर्थगंभीर प्रौढ शैलीचे साक्षरजीवन (निबंध, अपूर्ण, १८९९–१९०३ क्रमशः, ग्रंथरूपात १९१९) व अध्यात्मजीवन हे दोन ग्रंथ असून त्यांत त्यांचे दार्शनिक विचार प्रकट झाले आहेत. क्षेमराज अने साध्वी, सरस्वती अने माया ही त्यांची दोन अपूर्ण नाटके होत. पाश्चात्य हास्यरस, वडनगरानागर ब्राह्मणोनी वंशावळी, सती चुनी ( १९०३), ‘कविता, काव्य अने कवी ए विषये मिताक्षर’, ‘आध्यात्मिक कवि अने तेनी कविता’ इ. बरेचसे त्यांचे लेखन असून त्यातील काही अद्यापि अप्रकाशित आहे.

१८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. ( मृत्यू: ४ जानेवारी, १९०७ )

प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्र. व्ही. एस. गुहा- शिलाँग (आसाम) येथे मध्यम स्थितीतील कुटुंबात जन्म. कलकत्ता विद्यापीठाचे एम्. ए. (१९१५) हार्व्हर्ड विद्यापीठाचे ए. एम्. (१९२२) आणि पीएच्. डी. (१९२४). भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेत मानवशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती (१९२७–४५). १९४६ मध्ये गुहांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानवशास्त्र सर्वेक्षण संस्था स्थापन झाली. तिचे पहिले संचालक-सूत्रधार तेच झाले (१९४६–५४). पुढे एक वर्ष त्यांनी रांची येथे प्रशिक्षण शैक्षणिक केंद्रात संचालक म्हणून काम केले आणि नंतर ते बिहार आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक झाले (१९५६–५९). भारतात जनगणनेच्या कार्यपद्धतीत त्यांनी मौलिक भर घातली. मानवमितीच्या आधारे त्यांनी सहा मुख्य मानववंश व त्यांचे नऊ उपप्रकार स्पष्ट केले.

१९५८ मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या मानवशास्त्राच्या जागतिक परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. त्यांना अनेक सन्मानार्थ पदव्या व पदके मिळाली. मानवशास्त्र विषयातील बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतामध्ये मानवशास्त्र व मुख्यत्वे शारीरिक-मानवशास्त्र यांचा पाया घालण्याचे श्रेय गुहा यांना द्यावे लागेल. मॅन इन इंडिया, सायन्स अँड कल्चर, जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी वगैरे मान्यवर नियतकालिकांतून त्यांनी अनेक संशोधनपर लेख लिहिले. याशिवाय त्यांची विविध परिषदांतील भाषणे, जनगणनेसंबंधीचे व उत्खननांवर आधारित असे अहवाल लेखरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. जमशेटपूरजवळ घटशिला येथे ते अपघातात मरण पावले.

१९६१: मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन. (जन्म : १५ ऑगस्ट १८९४ )

  • घटना :
    १९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
    १९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
    १९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
    १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
    १९६२: चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
    १९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
    १९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
    २०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

• मृत्यू :
• १९७४: प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी, १८९८)
• १९९६: पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचे निधन.
• १९९९: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.
• २००९: गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन. (जन्म: ४ मे, १९२९)
• २०१०: क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी, १९४८)
२०१९ : ‘वज्रदेही मल्ल’ – महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद पैलवान दादू चौगले – १९७३ मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हेवीवेट गटात फ्री स्टाईल प्रकारात त्यांनी रौप्य पदकावर नाव कोरले.
त्यांना राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले .
‘वज्रदेही मल्ल’ – महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद पैलवान दादू चौगले यांचे निधन .

  • जन्म :
    १९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट, १९६९)
    १९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर, २०१०)
    १९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे, २००७)
    १९६३: क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.
    १९७८: आक्रमक फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »