ऊस वजन काट्यात येणार पारदर्शकता

काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना
पुणे : साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस वजनातील फसवणुकीला (काटामारी) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वजन काट्यांच्या तपासणीसाठी जुन्या नियमावलीत सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी चारतज्ज्ञअधिकाऱ्यांचीसमिती स्थापन करण्यात आली आहे.
बदलाचे स्वरूप आणि फायदे
ऑनलाइन देखरेख: सर्व वजन काटे थेट शासनाच्या सर्व्हरला ऑनलाइन जोडले जातील.
पारदर्शकता: प्रत्येक वजनाची नोंद रिअल-टाइममध्ये शासनाकडे उपलब्ध होईल, ज्यामुळे कारखान्यांवर अचूक वजनासाठी दबाव राहील.
अहवाल सादर करणे: समितीला येत्या गुरुवार (दि. १२) पर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोण आहे समितीत?
अध्यक्ष: सु. ह. चाटे (सह नियंत्रक, छत्रपती संभाजीनगर)
सदस्य सचिव: डी. पी. पवार (उप नियंत्रक, सांगली)
सदस्य: डी. के. शेजवल आणि आर. पी. टाळकुटे.
शेतकरी संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि वजनातील तक्रारींमुळे शासनाने हे पाऊल उचलले आहे.






