जकराया शुगर आवारात वृक्षारोपण

सोलापूर : जकराया शुगरने यंदा कारखाना परिसरात एक हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती जकराया शुगरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी दिली.
वटवटे (ता. मोहोळ) येथे कारखाना परिसरात वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, जनरल मॅनेजर कुबेरदास कलुबर्मे, मुख्य वित्त अधिकारी अनिल पवार, उत्पादन विभाग प्रमुख नागेश पवार इत्यादी उपस्थित होते. अॅड. जाधव यांनी मागील काही वर्षांपासून शासन, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. याचा पर्जन्यमान व पर्यावरणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जकराया शुगरने मागील काही वर्षांपासून विविध उपक्रमातून दहा हजारांच्यापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले असल्याचे सांगितले.