श्री तुळजाभवानी शुगर कारखान्यात मिल रोलर पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

परभणी : श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि. (आडगाव द. ता. सेलू जि.परभणी) कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२०२५ च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम दिनांक १४ जुलै २०२४ रविवार रोजी दुपारी १२:१० वाजता श्री. सचिन मुंगसे पाटील यांच्या हस्ते विधिवत पुजेने पार पडला.

यावेळी कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर श्री. सुधीर सालके, श्री. व्यंकट कदम, चिफ इंजिनियर श्री. महादेव भोयर, चीफ केमिस्ट श्री. आबासाहेब ढवळे, मुख्य शेतकी अधिकारी श्री. मुंजाजी वाव्हळ, श्री. गायकवाड, तसेच उत्पादन विभाग, शेतकी विभाग व इंजिनियरिंग विभागातील सर्व विभाग प्रमुख, सर्व खाते प्रमुख, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी तसेच सर्व कामगार बंधू उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »