व्हीएसआयमध्ये  दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जमिनीची सुपीकता खालावल्याने ऊस, साखर उताऱ्यात घट होत असल्याची चिंता

पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे  ‘बदलत्या हवामानानुसार ऊस उत्पादनवाढीचे अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावर बुधवारी (दि. ३०) दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.  एल. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख पाहुणे म्हणून कानपूर येथील चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लखनौ येथील भारतीय ऊससंशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एस. सोलोमन उपस्थित होते. तर या वेळी व्हीए-सआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि सल्लागार शिवाजीराव देशमुख हेसुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘व्हीएसआय’च्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. इंद्रजित मोहिते होते.

साखर उतारा कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एल. पाटील म्हणाले की, देशात ऊसशेतीतील जादा पाणी, असंतुलित व अवेळी देण्यात येणाऱ्या खतमात्रा, तसेच सेंद्रिय व जैविक खतवापराचा अभाव इ. कारणांमुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता खालावत चालली आहे.  यामुळे उसाच्या सरासरी उत्पादनावर परिणाम होत खंत त्यांनी व्यक्त केली.  त्यावर उपाययोजना म्हणून सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा एकत्मिक पध्दतीने वापर, पाण्याचा ताण व जमिनीतील क्षारता सहन करणाऱ्या ऊसजातींची लागवड, हिरवळीची खते वापर, पिकांची फेरपालट आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. एस. सोलोमन म्हणाले, पावसाच्या अनियमितपणामुळे उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा कमी होत आहे. बदलत्या हवामानात दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या उसाच्या नवीन जाती, कीडप्रतिबंधक उसाच्या जाती तयार करणे, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य प्रमाणात पाणी व खतव्यवस्थापन करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, जैविक खतांचा तसेच रासायनिक खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »