उदगिरी शुगरचे उद्दिष्ट ७ लाख टन गाळपाचे : डॉ. राहुल कदम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

२०२३-२४ गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन

सांगली : उदगिरी शुगरच्या २०२३-२४ च्या हंगामासाठी एकूण ७ लाख टन ऊस गाळप करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी दिली.

कारखान्याच्या २०२३-२४ गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन माजी आमदार मोहनराव कदम, कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि अध्यक्ष डॉ. राहुल कदम आदींच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. कदम म्हणाले की, ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी उसाच्या नोंदी घेणे तसेच तोडणी वाहतुकीचे करार करण्याचे काम सुरू आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढल्याने गाळप क्षमता ५ हजार टन करण्याचे, तसेच इथेनॉल उत्पादन क्षमता १ लाख ७५ हजार लिटर्स करण्याचे काम हाती घेतलेले आहे. उपस्थित होते.

यावेळी पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील, जे. के. बापू जाधव, प्रल्हाद पाटील, अनिल शिंदे, आबासाहेब चव्हाण, उदय कुलकर्णी, जितेंद्र मेटकरी, निवास पवार, आर. आर. चव्हाण, मुख्य शेती अधिकारी परशुराम चव्हाण, प्रशासकीय अधिकारी बशीर संदे, रत्नाकर जंगम इ. उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »