मंडलिक कारखाना दुसऱ्यांदा बिनविरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. खासदार संजय मंडलिक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे सभासदांचे कोट्यवधी रुपये वाचले.

उत्पादक गटातून खासदार संजय मंडलिक, संभाजी मोरे, तुकाराम ढोले, बोरवडे-आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, कागल – धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे, मौजे सांगाव –कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान, सेनापती कापशी – पुंडलिक पाटील, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

Mandlik sugar election

संस्था गटातून वीरेंद्र मंडलिक, अनुसूचित जाती व जमाती गटातून चित्रगुप्त प्रभावळकर, भटक्या जाती व जमाती गटातून विष्णू बुवा, महिला गटातून नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील, इतर मागास प्रवर्ग गटातून नेताजी बळवंत पाटील यांची निवड झाली.

दरम्यान, खा. मंडलिक म्हणाले, “साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते. आमदार हसन मुश्रीफ, छत्रपती शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, युवराज पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कारखाना सभासदांनी पाठबळ देऊन विश्वास दाखविला. यामुळे कारखाना निवडणुकीचा बिनविरोधाचा मार्ग सुकर झाला. ”

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »