गायक वसंतराव देशपांडे

आज बुधवार, जुलै ३०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ८, शके १९४७
सूर्योदय : ०६:१५ सूर्यास्त : १९:१५
चंद्रोदय : १०:५६ चंद्रास्त : २२:५४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – ०२:४१, जुलै ३१ पर्यंत
नक्षत्र : हस्त – २१:५३ पर्यंत
योग : सिद्ध – ०३:४०, जुलै ३१ पर्यंत
करण : कौलव – १३:४० पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०२:४१, जुलै ३१ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १२:४५ ते १४:२२
गुलिक काल : ११:०७ ते १२:४५
यमगण्ड : ०७:५२ ते ०९:३०
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१९ ते १३:११
अमृत काल : १५:१६ ते १७:०२
कल्कि हा श्रीविष्णूचा भविष्यात येणारा अवतार मानला जातो.
पुराणनुसार कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल.
कलियुगाच्या कालावधी 4,32,000 वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, 3,102 ईसापूर्व पासून सुरू होतो. हे फक्त 5,000 वर्षे टिकणारे आहे.
कलियुग अंतवेळी अर्थात संपूर्ण जगात मोठा भूकंप सुनामी (प्रलय) येऊन विष्णु कल्कि नारायण घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल.
आज कल्कि जयंती आहे.
दाटून कंठ येतो,
ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू,
जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतोs…
- गायक वसंतराव देशपांडे
गायक वसंतराव देशपांडे – एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व, पण गर्व, मीपणा याचा नावालादेखील लवलेश नव्हता. वझेबुवांबरोबर ते तालमीत जायचे. त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या ओळखीत वझेबुवांना एकदाही कळले नाही की वसंतराव गातातही म्हणून.
कोणत्याही घराण्याचे पाईक म्हणून त्यांनी मिरवलं नाही. एका मैफिलीमधे, त्यांच्या अतिशय रंगलेल्या गाण्यानंतर एकाने त्यांना विचारलं की, “काय हो देशपांडे, तुमचं घराणं कुठलं?” त्यावर ते ताडकन उत्तरले की, “आमच्यापासूनच सुरू होणारं आहे आमचं घराणं”. पण गातानाचे वसंतराव आणि गृहास्थश्रमातले वसंतराव यामधे कमालीचा फरक. अगदी दोन ध्रुवच.
गाणं शिकताना त्यांनी कसलाही पडदा मनावर पडू दिला नव्हता. ज्या नम्रतेने त्यांनी लाहोरच्या दर्ग्यामधे पटियाला घर्याणाचे उस्ताद असद अली खाँ यांच्याकडे ४-५ महिने फक्त मारवा शिकला, त्याच अदबीने सुरेशबाबू मानेंकडे पुण्यात गाणं. गाणं गातानाही स्पृश्य-अस्पृश्यता अजिबात नाही. म्हणूनच, जेवढं ’सावरे ऐ जय्यो’, ’ना मारो पिचकारी भर’, ’शतजन्म शोधिताना’, ’सुरत पिया की’ ऐकताना आपण तृप्त होतो, तेवढाच आनंद ’कोंबड्याची शान’ किंवा ’कुणासाठी सखे तु’ सारखी तुलनेने हलकी-फुलकी गाणी ऐकतानाही मिळतो.
मी त्यांच्याबद्दल काही लिहीण्याची तशी काही गरजच नाही. तसा मी काही त्यांच्या कुटुंबाच्या परिचयाचा नाही किंवा त्यांच्या गाण्याविषयी लिहीण्याएवढा जाणकारही. पण त्यांचं गाणं फार आवडलं, त्यांच्याबद्दल वाचलं आणि वाटलं की आपल्याला जे माहिती झालं ते शेअर करावं.
शास्त्रिय संगीत कळत नसलं तरी गाणं ऐकण्याची आवड असणार्या प्रत्येकाला त्यांचं गाणं नक्कीच मोहिनी घालणारं आहे. शारद पौर्णिमेला रात्री बरसणारं चांदणं अनुभवायला ’खगोलशास्त्रि’ असणं गरजेचं नसतं. वसंतरावांचं गाणं तर त्या चांदण्यापेक्षाही मोहित करणारं आहे….
‘कट्यार काळजात घुसली’ – १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच. ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं!
सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
•१९८३ : शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन ( जन्म : २० मे, १९२० )
लाखो सिनेरसिकांच्या मनात आईची प्रतिमा साकारणाऱ्या चित्रपटातील आई अभिनेत्री सुलोचना (लाटकर) – १९४३ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले.
भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. भालजी पेंढारकर यांनी त्यांची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांच्याकरता लावले. ते वाचणे हे चांगलेच क्लिष्ट काम होते. पण त्याबद्दल तक्रारीचा चकार शब्द न काढता सुलोचनाबाई चिकाटीने त्या भाषादिव्यातून गेल्या. त्यांची थट्टा व नक्कल करणारे महाभाग ‘पारिजातक’च्या चित्रीकरणाच्या वेळी सुलोचनाबाई संस्कृतप्रचुर संवाद अस्खलितपणे बोलताना पाहून थक्क झाले.
भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या.
शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. शिवाय यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत.
१९४३ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५०हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
भारत सरकारने १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तसेच महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता.
१९२८ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर) यांचा जन्म. ( मृत्यू : ४ जून, २०२३ )
- घटना :
७६२ :खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
१६२९ : इटलीतील नेपल्स शहरात भूकंपाने १०,००० जण मृत्युमुखी पडले.
१९६२ : ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरु झाला.
१९७१ : अपोलो १५ हे यान चंद्रावर उतरले.
२०१४ : पुणे जिल्ह्यात माळीण गावात दरड कोसळून सुमारे ५० जण मृत्युमुखी पडले.
२०२४ : केरळच्या वायनाड येथे भूस्खलन होऊन किमान १२३ जण ठार, तर १२८ जण जखमी झाले .
• मृत्यू :
•१९६० : कर्नाटक सिंह स्वातंत्र्य सैनिक गँगधार बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन ( जन्म : ३१ मार्च, १८७१ )
•१९९४ : मराठी ग्रामीण साहित्यिक चित्रपट कथा लेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन ( जन्म : ८ ऑगस्ट, १९२६ )
•२०११ : संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन (जन्म : २५ ऑक्टोबर, १९३७ )
•२०१३ : भारतीय इंग्रजी लेखक, कवी, नाटककार बेंजामिन वॊकर यांचे निधन ( जन्म : २५ नोव्हेंबर, १९१३ )
- जन्म :
• १९२८ : हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर) यांचा जन्म. ( मृत्यू : ४ जून, २०२३ )
१९५१ : भारतीय – इंग्रजी चित्रकार व मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.
१९७३ : पार्श्व गायक सोनू निगम यांचा जन्म.