आज विजया दशमी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, ऑक्टोबर २, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १० शके १९४७
सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२६
चंद्रोदय : १५:०८ चंद्रास्त : ०२:३१, ऑक्टोबर ०३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : दशमी – १९:१० पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – ०९:१३ पर्यंत
योग : सुकर्मा – २३:२९ पर्यंत
करण : तैतिल – ०७:११ पर्यंत
द्वितीय करण : गर – १९:१० पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मकर
राहुकाल : १३:५७ ते १५:२७
गुलिक काल : ०९:२८ ते १०:५८
यमगण्ड : ०६:२९ ते ०७:५९
अभिजित मुहूर्त : १२:०४ ते १२:५१
दुर्मुहूर्त : १०:२८ ते ११:१६
दुर्मुहूर्त : १५:१५ ते १६:०३
अमृत काल : २३:०१ ते ००:३८, ऑक्टोबर ०३
वर्ज्य : १३:१६ ते १४:५४

आज विजया दशमी आहे
“ विजया दशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा “

१९२५ : ।। परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् | समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।

राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात. फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.

पूर्णवेळ संघकार्य करणार्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणार्यांना प्रचारक म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. अनेक जण आजीवन प्रचारक देखील असतात. तसेच अशा ज्ञात अज्ञात लाखो स्वयंसेवकांचे सहभागातून संघ कार्य आज केवळ देशातच नव्हे तर विदेशातही मोठ्या प्रमाणावर वृंध्दींगत होत आहे.

आज स्थापनेला १०० वर्ष पुर्ण होत आहेत.

त्यानिमित्त्याने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे आपण त्यात सहभागी व्हावे ही प्रार्थना

१९२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ( २७ सप्टेंबर इ.स. १९२५ ) रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर येथे केली.

बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो.

विसाव्या शतकात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५,००,०००० अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे.

१९५६: डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. ( इंग्रजी तारीख १४ ऑक्टोबर, १९५६ )

आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन / स्वच्छता दिन / बाल सुरक्षा दिन आहे

गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करता येऊ शकते.

महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाने प्रभावित होऊन “असा हाडामासाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही”, असले गौरवोद्गार प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काढले होते.

१८६९ : मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर – गुजरात येथे जन्म.

“जय जवान – जय किसान “
तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.


निष्कलंक चारित्र्याच्या शास्त्रीजींची लोकप्रियता १९६५ मधल्या युद्धात पाकिस्तान वर विजय मिळवल्यामुळे प्रचंड वाढली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं वर्णन पाश्चात्य देशांनी केलं होतं. १९६२ च्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता. भारताची काही भूमी चीनने बळकावली होती.देशाची जगभरात मानहानी झाली होती.


त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान चे तेव्हाचे फिल्ड मार्शल अबुखान यांनी युद्धाच्या मार्गानं काश्मीर जिंकण्यासाठी १९६५ मध्ये भारताविरुद्ध युद्ध सुरू केलं. अवघ्या आठ दिवसाच्या आत जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरवर पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी झेंडा फडकवेल अशी स्वप्नं अयूबखान आणि त्यांचे तेव्हाचे सहकारी परराष्ट्र मंत्री झुल्फीकार अली भुट्टो पहात होते. प्रत्यक्षात मात्र उलटंच घडलं. शास्त्रीजींनी भारतीय भूमीवर आक्रमण करणार्या पाकिस्तानी लष्कराचा मुकाबला तर करावाच, पण पाकिस्तानी भूमीतही प्रतिआक्रमण करायचा आदेश लष्कराला दिला होता. भारतीय लष्करानं अवघ्या २१ दिवसांच्या त्या युद्धात पाकिस्तानी लष्कराचं कंबरडं मोडलं.

१९०४ : भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म ( मृत्यू : ११ जानेवारी, १९६६ )

महात्मा गांधी व भारतरत्न पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महात्म्यांना विनम्र अभिवादन

  • घटना :

१९०९ : रमाबाई रानडे यांनी पुण्यात सेवासदन संस्थेची स्थापना केली
१९२५ : जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले
१९५५ : पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरु केली
१९५८ : गिनी देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले
१९६७ : थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च् न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले
१९६९ : म. गांधींच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून रिझर्व्ह बँकेने त्यांची प्रतिमा व सही असणाऱ्या २, ५, १० व १०० रुपये चलनाच्या नोटा वापरात आणल्या.

• मृत्यू :

१९०६ : चित्रकार राजा रवी वर्मा यांचे निधन ( जन्म : २९ एप्रिल, १८४८ )
१९७४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचे निधन (जन्म: ११ सप्टेंबर १८८४)
१९७५ : स्वातंत्र्य सैनिक, खासदार व तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचे निधन ( जन्म : १५ जुलै, १९०३ )
१९८२: भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे निधन (जन्म: १४ जानेवारी १८९६)
२०२१ : ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार आणि विनोदी लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांचे निधन ( जन्म : १४ एप्रिल, १९२७ )
२०२२: भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऍटलास रामचंद्रन यांचे निधन (जन्म: ३१ जुलै १९४२)

  • जन्म :
    १८९१ : पदमश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म ( मृत्यू : १३ जून , १९६७ )
    १९०८ : विचारवंत व साहित्यिक , पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण तथा गं. बा. सरदार यांचा जन्म ( मृत्यू : १ डिसेंबर, १९८८ )
    १९२७ : शास्त्रीय गायक पं दिनकर कैकाणी यांचा जन्म ( मृत्यू : २३ जानेवारी, २०१० )
    १९४२ : चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म
    १९४८ : अभिनेत्री व लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म ( मृत्यू : १८ ऑगस्ट, १९९८ )
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »