पद्मश्री विखे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

नगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरानगर) च्या ७४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन दसऱ्याच्या मुहूर्तावर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,भाजीपला सहकारी सोसायटीच्या अध्यक्षा सौ. गीता थेटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोंदकर, उपसभापती कडू, उपाध्यक्ष सतीश ससाणे , बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थिटे, शांतीनाथ आहेर, कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधिवत बॉयलर पूजन श्री. व सौ. दादासाहेब घोगरे, श्री. व सौ. धनंजय दळे, श्री. व सौ. अण्णासाहेब मुरलीधर म्हस्के, श्री. व सौ. बापूसाहेब वडीक्के, श्री. व सौ. संजय गाडेकर या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले.