सहकार मलाच कळतो, असा काहींचा अविर्भाव : विखे
पुणे : अनेक वर्षे सहकार चळवळ दावणीला बांधून ठेवणारे कारखानदारीचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. सहकार मलाच कळतो, अशा आविर्भावात काही मंडळी होती, अशी थेट टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेतला केली.
ते डीएसटीएच्या ६९ व्या अधिवशेनाच्या उद्घाटन सत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. ते म्हणाले,
आता देशातल्या केंद्रीय नेतृत्वाकडून सहकाराचे प्रश्न सोडविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पहिले सहकारमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सहकारी साखर कारखानदारीचा प्राप्तिकराचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या परिषदेमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याची अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
बंद पडलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन ते खासकीकरणाद्वारे चालवण्यात येऊ लागली. या मंडळींनी महाराष्ट्रातील सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सहकार चळवळीचे आम्हालाच कळते, अशा अविर्भावात ते असतात, असे विखे म्हणाले.