सुंदरराव सोळंके कारखान्याच्या चेअरमनपदी वीरेंद्र सोळंके

बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वीरेंद्र सोळंके, तर व्हाईस चेअरमनपदी जयसिंग सोळंके यांची निवड झाली आहे.
कारखान्याच्या चेअरमन व हाईस चेअरमनपदाची जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात शुक्रवारी नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी विरेंद्र सोळंके व्हाईस चेअरमनपदी जयसिंग सोळंके यांचे अर्ज दाखल झाले होते. नंतर निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी वरील दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे दि. १४ जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते.
संचालक मंडळात गट निहाय संचालक पुढील प्रमाणे- मोहखेड गट आ. प्रकाशदादा सोळंके, जयसिंग सोळंके, पोहनेर गट पंडीत निर्मळ, संभाजी शेजूळ, दिड गट बारीकराव शिंदे. ज्ञानेश्वर होरमाळे, वडवणी गट -रुक्मानंद शेंडगे, दत्तात्रय दुधाने भगवान लंगे, माजलगाव गट- विरेंद्र सोळंके, छगन जाधव, सोपान सोळंके, टाकरवण गट- तुषार घाटूळ, शहाजी कोलते, मुंजाबा तौर तर सहकारी संस्था मधून दिपक सोळंके, अनुसूचित जाती/जमातीतून विष्णू निरडे, महिलातून शशिकला गांडगे, अनुसया डाके, ओबीसी प्रवर्गातून आबासाहेब गायकवाड, विशेष मागास प्रवर्गातून लोमा.