महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

आज गुरुवार, जानेवारी २, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १२, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१२ सूर्यास्त : १८:१३
चंद्रोदय : ०९:१४ चंद्रास्त : २०:३९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – ०१:०८, जानेवारी ०३ पर्यंत
नक्षत्र : श्रवण – २३:१० पर्यंत
योग : हर्षण – १४:५८ पर्यंत
करण : तैतिल – १३:४८ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०१:०८, जानेवारी ०३ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मकर
राहुकाल : १४:०५ ते १५:२८
गुलिक काल : ०९:५७ ते ११:२०
यमगण्ड : ०७:१२ ते ०८:३५
अभिजितमुहूर्त : १२:२१ ते १३:०५
दुर्मुहूर्त : १०:५३ ते ११:३७
दुर्मुहूर्त : १५:१७ ते १६:०१
अमृत काल : १३:०२ ते १४:३५
वर्ज्य : ०३:०२, जानेवारी ०३ ते ०४:३५, जानेवारी ०३
समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.
जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. विठ्ठल रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले.
श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले.
१८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.
भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.
धर्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल्अ मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले.
शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.
• १९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)
आज संस्थानाच्या विलीनीकरणाचे जनक व ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब – भारतात संस्थानाच्या विलीनीकरणाचा विषय येतो, तेव्हा डोक्यात पहिल्यांदा सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव येतं. पण स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी संस्थानांचं विलीनीकरण असेल तरे ते ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब.
ओडिशा प्रांतातल्या २६ संस्थानांच्या विलीनीकरणाचा मुद्दा मांडला. सगळ्या संस्थानिकांना ओडिशात विलीन होण्याचा आदेशच काढला. पण संस्थानिकांनी यास विरोध केला. मिलिटरीच्या मदतीनं कोणत्याही रक्तपाताशिवाय १४ नोव्हेंबर १९४७ ला संस्थानांचं विलीनिकरण झालं. ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या हरेकृष्ण महताब यांना लोकांनी ओडिशाचे सिंह अशी पदवी दिली.
मुंबई राज्याचे राज्यपाल राहिलेल्या हरेकृष्ण महताब यांच्यामुळे प्रतापगडावरील शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा राहिला. आपल्या महाबळेश्वर भेटीदरम्यान प्रतापगडाची माहिती मिळताच या गडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून महताब यांनी गडावर शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची योजना तयार केली व अमलात आणली. प्रतापगडाच्या महा दरवाजापर्यंतचा पक्का रस्ता पूर्ण करून २० नोव्हेंबर १९५७ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
आधुनिक सोयीसुविधांच्या दृष्टीनं त्यांनी ओडिशाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवली. पुढं ते पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात गेले. मुंबई प्रांताचे गवर्नर म्हणूनही काम केलं. हरेकृष्ण महताब यांनी ओडिशाचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले होते. हरेकृष्ण महताब यांनी १९७७ मधे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली.
१९८७ : संस्थानच्या विलीनीकरणाचे जनक व ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांचे निधन. (जन्म : २१ नोव्हेंबर १८९९ )
१९४३: हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल यांचा हुतात्मा दिन (जन्म: १ डिसेंबर, इ.स. १९१२)
- घटना :
१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.
१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
• मृत्यू :
• १९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट,१८८६)
• १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल ,१९५४)
• १९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.
• २००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.
• २००९ : ज्ञानेश्वर आगाशे – उद्योजक, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक होते. ते बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेटचे ( BMSS )अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते कोल्हापूर स्टीलचे अध्यक्ष तसेच सुवर्ण सहकारी बॅंकेचे आणि मंदार प्रिंटिंग प्रेसचे संस्थापक होते. आगाशे १९९५ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष होते. १९६९ साली ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य झाले आणि १९८९ मध्ये ते संघाचे कार्यकारी अध्यक्ष बनले.
यष्टीरक्षक-फलंदाज असलेले आगाशे १९६२ ते १९६८ दरम्यान महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. आगाशे आणि त्यांचे कुटुंब सुवर्ण सहकारी बॅंकेतील घोटाळ्यामध्ये गोत्यात आले. यासंबंधी न्यायालयीन कोठडीत असताना, मधुमेहातून झालेल्या गुंतागुंतीमुळे आगाशे यांचा मृत्यू झाला. ( जन्म : १७ एप्रिल, १९४२ )
• २०१५: भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार शास्रज्ञ पद्मभूषण वसंत गोवारीकर यांचे निधन. (जन्म : २५ मार्च, १९३३ )
• २०१९ : क्रिकेट खेळाचे प्रशिक्षक व द्रोणाचार्य ‘पद्मश्री’रमाकांत आचरेकर सर यांचे निधन.
‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारनं तशी कोणतीही घोषणा केली नाही. सरकारच्या या अनास्थेबद्दल क्रिकेटप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
- जन्म :
१९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)
१९५९: क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.
१९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)