संसदपटू विठ्ठलभाई पटेल

आज मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २७ , शके १९४६
सूर्योदय : ०७:०५ सूर्यास्त : १८:४०
चंद्रोदय : २३:२९ चंद्रास्त : १०:१९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्र : चित्रा – ०७:३५ पर्यंत
योग : गण्ड – ०९:५२ पर्यंत
करण : गर – १८:१३ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १५:४६ ते १७:१३
गुलिक काल : १२:५२ ते १४:१९
यमगण्ड : ०९:५९ ते ११:२६
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१६
दुर्मुहूर्त : ०९:२४ ते १०:१०
दुर्मुहूर्त : २३:३८ ते ००:२७, फेब्रुवारी १९
अमृत काल : ००:४४, फेब्रुवारी १९ ते ०२:३२, फेब्रुवारी १९
वर्ज्य : १३:५४ ते १५:४३
योगी चैतन्य महाप्रभू – कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी केवळ बंगाल-ओडिसात नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी ‘चैतन्य चरितामृत’ हा ग्रंथ लिहून बंगाली काव्यरचनेस सुरुवात केली. वृंदावनदासाने ‘चैतन्य भागवत’ रचले. लोचनदास कवीने ‘चैतन्य मंगलची’ रचना केली.
१४८६: योगी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १५३४)
‘अविद्य सुविद्य दोन्ही हात मिळविती
भक्ति ते सांडूनि बाई, अभक्त फेऱ्या घेती
फू गडी फू गं दत्तु माय तू गं’ (फुगडी)
सर्वज्ञ बाळा आली गोंधळा,
योगीया तारण हेतू गे माये
परिस योगी वाजवी शिंगी,
चेवविला अवधूतू गे माये (गोंधळ)
संत दासोपंतांच्या पद्यनाट्यावरून, लळित पदांवरून सर्वज्ञ दासोपंत उत्तम ‘नाटककार’, ‘रंगकर्मी’, ‘दिग्दर्शक’ होते हे सिद्ध होते. अध्यात्म ज्ञानी तरीही सगुणाचा प्रेमवेडा उपासक असलेला हा श्रीदत्तभक्त मध्ययुगातील अंबाजोगाईच्या देवघराच्या रंगपीठावरचा अधिकारी कलावंत होता हे निश्चित.
आज संतकवी दासो दिगंबर देशपांडे उर्फ दासोपंत – माघ वद्य षष्ठी शके १५३७ ला ते समाधिस्थ होऊन श्री दत्तस्वरूपात विलीन झाले. ( तिथी नुसार )
रामकृष्ण खुदिराम परमहंस – माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, – पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो – परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.- रामकृष्ण परमहंस
१८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
एक थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू विठ्ठलभाई पटेल- पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून गाजलेले विठ्ठलभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे वडीलबंधू होत.
मुंबईला आल्यावर पुन्हा वकिली सुरूकेली व १९११ साली मुंबई कायदेमंडळात ते निवडून आले. त्यांनी सर्व बिनसरकारी सभासद एकत्र आणून सरकारी धोरणावर प्रभाव पाडला. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात यावे, या उद्देशाने त्यांनी एक विधेयक मांडले. ही त्यांची एक महत्त्वाची कामगिरी होती. ४. सप्टेंबर १९१८ रोजी इंपीरियल कौन्सिलचे ते सभासद झाले. तेथे त्यांनी हिंदू मिश्रविवाहाचा प्रस्ताव मांडला; परंतु कौन्सिल बरखास्त झाल्यामुळे त्याचा विचार झाला नाही.
विठ्ठलभाई १९१५ च्या मुंबई काँग्रेसच्या खास अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. १९१९ साली त्यांनी काळा कायदा म्हणून प्रसिद्ध झालेल्या रौलट अॅक्टोबर प्रखर टीका केली. विलायतेत पार्लमेंटने माँटेग्यू सुधारणांचा विचार करण्याकरिता जॉइंट सिलेक्ट कमिटी नेमली. त्या समितीपुढे साक्ष देण्याकरिता काँग्रेसने पटेलांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविले. तेथे अनेक शिष्ठमंडळे गेली. पटेल-टिळकांचे शिष्टमंडळ एकत्र काम करी व बेझंटबाईंना विरोध करी.
पटेल यांची त्या काळातील इंग्लंडमधील कामगिरी संस्मरणीय झाली. असहकारितेच्या आंदोलनातील विधिमंडळ-बहिष्कार पटेलांना मान्य नव्हता; पण त्यांनी पक्षशिस्त पाळली. विधिमंडळाचा राजीनामा दिला व निवडणुकीला ते पुन्हा उभे राहिले नाहीत. पुढे ते स्वराज्य पक्षात गेले.
१९२३ च्या नागपूर झेंडा सत्याग्रहात विठ्ठलभाई पटेल एक पुढारी होते. त्यांच्याच मुत्सद्दीपणामुळे तो सत्याग्रह यशस्वी झाला.
१९२२ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले. त्यांच्या प्रयत्नाने शाळांतून हिंदी शिकविण्यास सुरुवाद झाली. सर्व खात्यांत स्वदेशी माल घेण्याचे घोरणही त्यांच्यामुळेच स्वीकारले गेले. नंतर ते मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दीतच गांधींना मानपत्र देण्यात आले. १९२३ साली ते मुंबई शहरातून स्वराज्य पक्षातर्फे मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून गेले.
१९१९ च्या कायद्यानुसार मध्यवर्ती कायदेमंडळाच्या अध्यक्षपदाची निवड होऊन २५ ऑगस्ट १९२५ रोजी पटेल ह्यांना ५८ मते आणि रंगाचारी ह्यांना ५६ मते पडून पटेल अध्यक्ष झाले. ते पहिलेच लोकनियुक्त् अध्यक्ष होत. पटेल यांची कारकीर्द एका वर्षाच्या मुदतीतसुद्धा फार गाजली.
१९२६ च्या नोव्हेंबरात पटेल यांची पुन्हा अध्यक्षस्थानी फेरनिवडणूक झाली. १९२८ मध्ये सरकारने विशिष्ट राजकीय प्रचाराला आळा घालण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणले. बिलाचा रोख मुख्यतः मीरत कटाच्या खटल्यात गुंतलेल्या कम्युनिस्टांविरुद्ध होता. पटेलांनी पहिल्या खेपेला समसमान मते पडली असता, आपले जादा मत बिलाविरुद्ध दिले. तेव्हा सरकारने १९२९ फेब्रुवारी मध्ये पुन्हा दुसरे पब्लिक सेफ्टी बिल आणले. मीरत कटाचा खटला चालू होता, तेव्हा पटेल यांनी विषय न्यायप्रविष्ट असल्यामुले विधेयक परत ध्यावे किंवा खटला काढून घ्यावा असा सल्ला दिला. सरकारने पटेल यांचा सल्ला ऐकला नाही.
८ एप्रिल १९२९ रोजी विधेयकाचा निकाल होणार होता, त्याचा दिवशी सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्ब टाकून विलक्षण सळबळ उडविली. पुठे ते विधेयक ११ एप्रिलला आले असता अध्यक्षांनी ते नियमबाह्य ठरविले. सरकारने वटहुकूम काढून हे विधेयक अंमलात आणले.
सत्याग्रहाच्या लढ्याच्या वेळी पटेल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला (१९३०). २० ऑगस्ट रोजी पेशावरला केलेल्या अत्याचाराचा अहवाल देण्याकरिता जी समिती नेमली होती, तिचे ते अध्यक्ष होते; पण या अहवालावर सरकारने बंदी घातली. तो हुकूम अमान्य केला गेला व पटेलांना सहा महिने शिक्षा झाली; पण प्रकृतीच्या सबबीवर ते लवकर सुटले. २४ फेब्रुवारी १९३१ रोजी ते व्हिएन्नाला गेले. १९३१ च्या डिसेंबरमध्ये परत आले.
१९३२ च्या लढ्यात त्यांना पुन्हा अटक झाली. तुरुंगातच त्यांची प्रकडती अधिक बिघडत गेली.
औषधोपचारासाठी ते यूरोपात गेले, तेथे त्यांची प्रकृती अधिक बिघडली व थोड्याच दिवसात जिनीव्हा येथे ते मरण पावले. मुंबई महानगरपालिका, मुंबई विधिमंडळ व काँग्रेस अशा तीन क्षेत्रांत जरी त्यांनी कार्य केले, तरी संसदपटू म्हणूनच ते सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यांचे अस्खलित वक्तृत्व, कुशल संसदपटुत्व व सरकारशी असलेले अडवणुकीचे तर्कशुद्ध घोरण यांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ते प्रसिद्ध होते. आपल्या पगारापैकी काही रक्कम ते महात्मा गांधीना देत. त्यांनी आपल्या संपत्तीचा विश्वस्त नेमला होता. यातूनच पुढे मुलींची एक शाळा गुजरातमध्ये काढण्यात आली.
१८७१: थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३)
- घटना :
१९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
• मृत्यू :
• १८७१ : महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत विष्णू भिकाजी गोखले ( विष्णुबुवा/ विष्णुबावा ब्रह्मचारी ) यांचे निधन (जन्म : २० जुलै, १८२५ )
• १९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)
• १९९४: कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)
- जन्म :
१८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२)
१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)
१९११: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०००)
१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७६)
१९२६: अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)
१९२७: संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम यांचा जन्म.
१९३३: अभिनेत्री नवाब बानू ऊर्फ निम्मी यांचा जन्म.