माळेगाव साखर कारखान्यासाठी २२ जूनला मतदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे :  सहकारातील अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे, त्‍यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.  या निवडणुकीसाठी २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.  २२ जूनला मतदान, तर २४ जून रोजी मतमोजणी होणार असल्‍याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत.

यापूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे निवडणुकीला स्थगिती होती. दरम्‍यान, न्यायालयात याचिका फेटाळल्‍यानंतर निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सह संचालकांनी शिवनगर येथील दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रारुप मतदार यादी २० जानेवारी २०२५ आणि अंतिम मतदार यादी ही १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केली आहे.

‘माळेगाव’साठी निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल –  २१ ते २७ मे

उमेदवार यादी प्रसिद्धी- २१ ते २७ मे

अर्ज छाननी – २८ मे

वैध उमेदवार यादी प्रसिद्धी – २९ मे

उमेदवारी अर्ज माघार मुदत २९ मे ते १२ जून

अंतिम यादी व चिन्हवाटप – १३ जून

मतदान- २२ जून

मतमोजणी – २४ जून

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »