आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

आज रविवार, मे १८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २८, शके १९४७
सूर्योदय : ०६:०३सूर्यास्त : १९:०७
चंद्रोदय : ००:०६, मे १९ चंद्रास्त : १०:३०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – १८:५२ पर्यंत
योग : शुभ – ०६:४३ पर्यंत
क्षय योग : शुक्ल – ०५:५३, मे १९ पर्यंत
करणगर – १८:०८ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मकर
राहुकाल : १७:२९ ते १९:०७
गुलिक काल : १५:५१ ते १७:२९
यमगण्ड : १२:३५ ते १४:१३
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १७:२३ ते १८:१५
अमृत काल : १२:१० ते १३:५१
वर्ज्य : २२:५९ ते ००:३७, मे १९
आज माता वासवी कन्या प्रगट दिन आहे.
१९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.
संग्रह करण्याची कल्पना प्राचीन काळी ग्रीस देशात उदय पावली.
इसवी सनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीने इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिले वस्तू संग्रहालय स्थापले. त्यात ग्रीक पंडितांचे पुतळे, शूर पुरुषांचे पुतळे, शल्यक्रियेची उपकरणे, विविध ग्रंथ, निसर्गातील चमत्कारिक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला होता. पुढे युरोपात अशी अनेक खाजगी संग्रहालये निर्माण झाली. कालांतराने अशी वस्तू संग्रहालये ही मनोरंजनाची व ज्ञान साधनेची केंद्रे मानली जाऊ लागली, त्यामुळे सार्वजनिक संग्रहालये स्थापण्याची कल्पनाही उगम पावली.
भारतातील पहिले संग्रहालय डॉ. वॉलिस या डॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळे स्थापन झाले. त्यानंतर इ.स. १८५० च्या सुमारास मद्रासमध्ये दुसरे संग्रहालय झाले. इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीचा अर्धशतसांवत्सरिक उत्सव झाला. त्या निमित्ताने भारतातही अनेक ठिकाणी संग्रहालये सुरू करण्यात आली.
आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे.
‘अविकत्थनः क्षमावानतिगंभीरो महासत्त्वः । स्थेयान्निगूढमानो धीरोदात्तो दृढवतः कथितः ।।’
साहित्य दर्पणकार यांनी केलेले छत्रपती शाहू महाराजांचे वर्णन
शाहू महाराजांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांची राहणी साधी होती. ते निर्व्यसनी होते. सामान्य लोकांत मिसळत असत. तसेच ते उदार, दयाळू , आणि कुटुंबवत्सल होते. नेहमीच प्रजेच्या हितासाठी झटत असत. शाहूंना उत्तम घोडे, कुत्रे, पक्षी बाळगण्याची मोठी हौस होती. त्यांनी अनेक बागाही फुलवल्या. वाडवडिलांप्रमाणेच शाहूसुद्धा मुस्लिमांचे किंवा इस्लाम धर्माचे द्वेष्टे नव्हते. एवढेच नव्हे तर औरंगजेबाची मुलगी झीनतउन्निसा हिला ते खूप आदर देत होते.
१६८२: छत्रपती शाहूराजे भोसले तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. ( चौथे शाहू ) (मृत्यू: १५ डिसेंबर , १७४९)
मराठीतील आद्यसंपादक – आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला.
इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. अगदी वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केले. तत्कालीन प्रमुख ८ भाषा व अनेक शास्त्रात ते पारंगत होते.
१८३४ साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि १८४५ साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत.
एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानांच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ १८५१ साली त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे.
आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे.
ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते. बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्यांच्यासोबत त्यांना आद्य प्राध्यापक संबोधिले जाते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे. हे आजच्या माध्यम क्रांती संदर्भात अभ्यासले असता सहजतेने लक्षात येऊ शकते.
१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी ,१८१२)
२०२४ : रघुनंदन कामात यांचे निधन . 14 फेब्रुवारी 1984 रोजी रघुनंदन यांनी जुहू परिसरात Naturals Ice Cream, Mumbai या नावाने पहिले आऊटलेट सुरु केले.
- घटना :
१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.
१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च् एव्हरेस्ट शिखर सर केले.
२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.
• मृत्यू :
१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर ,१९०४)
१९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर ,१९०१)
१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन,१९५८)
- जन्म :
१९१३: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९९८)
१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर, १९५५)