व्हीपीके समूह देणार हेक्टरी ६२५० रु. अनुदान
नांदेड : आडसाली ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६२५०/- रूपये अनुदान देण्याची घोषणा व्हीपीके उद्योग समूहाने केली आहे. त्यासाठी १५ ऑगस्टची कालमर्यादा निश्चित केली आहे. आडसाली ऊस लागवडीसाठी तयारी करुन मोफत बेणे वाटप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊस विकास अविकारी एस. जे. सावंत यांनी केले आहे..
नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन खरीप हातचा केला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास लागवड खर्चासाठी कुणापुढे हात पसरण्याची गरज पडू नये म्हणून ऊस लागवडीसाठी प्रती हेक्टरी ६२५० रूपये बेणे खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
नायगाव मतदार संघातील उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली व भोकर तालुक्यातील जे शेतकरी १५ तारखेपर्यंत आडसाली हंगामात ऊस लागवड करण्यास इच्छुक आहेत. अशा शेतकऱ्यास खालील प्रमाणे ऊस विकास योजना राबवण्यात येणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना आडसाली उसाची लागवड करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी आपला आर्ज संबंधित कृषी सहाय्यक किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सदर करावा, असे व्हीपीके समूहाने म्हटले आहे.