योग्य नियोजन केल्यास ‘शून्य टक्के मिल बंद तास’ शक्य : आहेर
![W R Aher at Shri Shri sugar](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/06/aher-at-shri-shri2.jpg?fit=768%2C479&ssl=1)
सांगली : साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावरील व्याख्यान सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी (जि. सांगली) येथे झाले.
साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. उदय जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठीआणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री. आहेर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. उदय जाधव यांनी प्रास्ताविक करून श्री. आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर त्यांचा हृद्य सत्कार केला. आहेर यांनी हे विचारपुष्प सद्गुरू श्री श्री रवीशंकर गुरुजी यांना अर्पण केले.
![Aher and uday jadhav](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/06/aher-at-shri-shri-e1686990737565-1024x575.jpeg?resize=1024%2C575&ssl=1)
कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो – करोडो रुपयांचे नुकसान कसे होते हे आकडेवारीनिशी आणि कारखाना स्टॉपेजेसच्या संदर्भासह श्री. आहेर यांनी व्यवस्थितपणे समजून सांगितले.
यावर उपाययोजना म्हणून “एकच ध्यास, “शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली आणि किमान आठ-दहा टक्के स्टाॅपेजेस आपण सुयोग्य नियोजन करून अनलोडर ते शुगर ग्रेडर पर्यंतचे ऑफ सिझन मध्येच कसोशीने मेंटेनन्स करून वेळेचे, कामगारांचे, स्पेशल पार्टचे आणि व्यवस्थापनातर्फे आर्थिक नियोजन करून आपण साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास’ ची अंमलबजावणी करू शकतो आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळता येते. त्यामुळे मिलचे रिझल्ट सुधारतात. वेळेची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, असे आहेर समाजवून सांगितले.
कारखान्याने काही प्रमाणात गुंतवणूक करून इव्हपरेटरसारखे युनिट स्टॅण्डबाय ठेवून उर्वरित मिल बंद तास कमी होऊ शकतील असे सुचवले. तसेच कारखान्याने कमी स्टाॅपेज नोंदवून शुन्य टक्के मिल बंद तास या दिशेने वाटचाल केली त्याबद्दल व्यवस्थापनाचे श्री आहेर यांनी अभिनंदन केले.
या सत्रात हाय प्रेशर बाॅयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ऑफ सिझन मध्ये करावयाचे मेंटेनन्स तसेच बाॅयलरची सुरक्षितता आणि शासकीय नियमांचे पालन या विषयावर शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून काही टिप्स दिल्या. बाॅयलरचे डिझाईन रचना त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल, बाॅयलरची फीड वाॅटर केमिस्ट्री, पोलूशन नियंत्रण, बगॅस सेव्हिंग, वीज उत्पादन या विषयावरील प्रश्नांची श्री.आहेर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये बाॅयलरचे कामकाजाविषयी आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
कारखान्याचे वर्क्स मॅनेजर संदीप पाटील तसेच आणि त्यांचे सहकारी सर्व इंजिनिअर आणि चिफ केमिस्ट नागेश पवार तसेच एचआर मॅनेजर सचिन खटके , सर्व कामगार बांधव आवर्जून उपस्थित होते. कार्यकारी संचालक जाधव यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. इंजिनिअर ए. के. जमदाडे यांनी आभार मानले.