हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशनवर आहेर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना (निवृत्तीनगर, जुन्नर) येथे साखर उद्योगतील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांनी ‘शून्य टक्के मिल बंद तास’ आणि हाय प्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, देखभाल आणि सुरक्षितता यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान नुकतेच झाले.

।”एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास”। ही संकल्पना श्री. आहेर यांनी तपशीलवार मांडली आणि कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान कसे वाचवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

VIGHNHAR SUGAR MILL

कारखान्याचे चेअरमन श्री. सत्यशील शेरकर यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक श्री. भास्कर घुले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री. बाळासाहेब शिंदे, सेक्रेटरी श्री.थोरवे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर श्री. बाहुबली आणि इंजिनिअर, केमिस्ट, कारखाना कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.
टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री. आहेर यांचे व्याख्यान झाले. श्री.बाळासाहेब शिंदे ‌यांनी प्रास्ताविक केले. श्री. भास्कर घुले यांनी श्री. आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर त्यांचा सत्कार सेक्रेटरी श्री. थोरवे यांनी केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

  1. Relating to Sugar Industry technology developed both in process and engineering including utilities Power ,Steam etc to bear minimum. Regarding to Farmer only Sugar cane sale price is below RS 3 to 3.50 per kg . Where as all other agricultural produces including Rice ,wheat , Vegitables etc are sold more than 20 to 50 Rupees per Kg which are short term Crops .How Sugar cane grower will survive ? All intillgiants and Technocrates should think where is wrong ? Advise Governments to be clear to survive farmers existence .

    • Totally agree sir.
      Food for thought. Will try to open discussion on this topic n bring it on anvil of govt agenda.
      Thanks a lot.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »