वा. र. आहेर (वाढदिवस विशेष)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया (डीएसटीएआय) आणि महाराष्ट्र बॉयलर परीक्षा बोर्ड मुंबईचे सदस्य, प्रथितयश साखर सल्लागार वा. र. आहेर यांचा २ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

जनता उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय (मुखेड, तालुका येवले) येथे सन 1973-74 च्या अकरावीचे 25 माजी विद्यार्थी आणि 8 माजी शिक्षक यांचा मेळावा श्री. कैलासराव आहेर आणि वकील श्री प्रतापराव आहेर यांचे पुढाकाराने हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. श्री. आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळी त्यांचा सपत्निक हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.

Aher W R

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.देवरे होते. पसायदानाने कार्यक्रमास सुरुवात करून उपस्थित सर्व माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचा यथोचित शाल देऊन सत्कार केला आणि प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. श्री. आहेर कैलासराव यांनी सूत्रसंचालन केले.

माजी शिक्षक श्री. व्ही. डी. देवरे, कापडणीस, निकम, कुलकर्णी, गवारे, ठोंबरे, दरेकर यानी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी श्री.सदाशिव कुंभकर्ण, इक्बाल शेख, सानप, शिवाजी गुंड, भाऊसाहेब आहेर, कैलासराव आहेर, प्रतापराव आहेर, भिमाजी शेळके, कदम, घोटेकर, श्रीमती सुनंदा कुलकर्णी राॅय, श्रीमती लीलाताई आहेर, मोगल आदींसह 24 माजी विद्यार्थी सपत्नीक उपस्थित होते. तसेच गावातील जेष्ठ नागरिक परशराम शिंदे, भगवानशेट कासार, अशोक कुलकर्णी , माधवराव आहेर, इंजिनिअर श्री.वा.र आहेर, सुकदेव आहेर, दिनकर आहेर, राजेंद्र आहेर, प्रकाश आहेर आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भगत, ग्रामस्थ उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »