हाय प्रेशर बॉयलरची काळजी : आहेर यांचे सखोल मार्गदर्शन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नाशिक : साखर उद्योगतील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांचे”हायप्रेशर बॉयलर’ चे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता” या विषयावर द्वारकाधीश साखर कारखाना लि. ताहाराबाद, जिल्हा- नासिक येथे व्याख्यान झाले.

साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक सचिन सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात, द्वारकाधीश साखर कारखाना लि. आणि आदिवासी सहकारी साखर कारखाना लि. नवापूर या दोन्ही कारखान्याचे सीईओ एस. टी. भालेराव आणि विजयानंद कुशारे, वर्क्स मॅनेजर साळुंके, चिफ इंजिनिअर राहुल मरगळ, चिफ केमिस्ट विजय वाघ आणि भामरे , सर्व इंजिनिअर, केमिस्ट आणि कारखाना कर्मचारी यांना श्री. आहेर यांनी मार्गदर्शन केले.

कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकार श्री. भालेराव यांनी प्रास्ताविक करताना, श्री.आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर श्री. आहेर यांचा चेअरमन श्री. शंकरराव सावंत यांनी सत्कार केला. श्री. आहेर यांनी हे विचारपुष्प संतश्रेष्ठ देव मामलेदार यांना अर्पण केले.

या सत्रात हाय प्रेशर बॉयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ऑफ सिझन मध्ये करावयाचे मेंटेनन्स तसेच बॉयलरची सुरक्षितता आणि शासकीय नियमांचे पालन या विषयावर श्री. आहेर यांनी शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून काही टिप्स दिल्या.

बॉयलरचे डिझाईन, रचना त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल, फीड वॉटर केमिस्ट्री, पोलूशन नियंत्रण, बगॅस सेव्हिंग, वीज उत्पादन या विषयावरील प्रश्नांची श्री.आहेर यांनी समर्पक उत्तरे देऊन सर्वांचे शंका- समाधानकारक केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये बॉयलरच्या कामकाजाविषयी आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

दुस-या सत्रात “एकच ध्यास,एकच ध्यास””शून्य टक्के मिल बंद तास” या सं कल्पनेचे महत्त्व विशद केले. नंतर श्री ‌आहेर यांनी कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो – करोडो रुपयांचे नुकसान कसे होते हे आकडवारीनिशी सांगितल्यावर यावर उपाययोजना म्हणून “एकच ध्यास,एकच ध्यास” “शून्य टक्के मिल बंद तास’’ या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली.

चेअरमन शंकरराव सावंत यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. वर्क्स मॅनेजर साळुंके यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »