निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे आहेर यांचे व्याख्यान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेळगावी : साखर उद्योगतील तांत्रिक सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. ‌आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयावर एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटय़ूट बेळगावच्या वतीने भारतरत्न सर विश्वेश्वरया ऊस संशोधन केंद्र (मंड्या, कर्नाटक) येथे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी या संकल्पनेमागची भूमिका, गरज, परिणाम आणि व्याप्ती विविध उदाहरणांसह समजावून सांगितली.

२९ मे २३ रोजी श्री. आहेर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष श्री. खांडगावे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि भारतरत्न सर विश्वेश्वरया ऊस संशोधन केंद्र मंड्याचे प्रमुख श्री. राघवेंद्र आणि प्राध्यापक सुनील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रारंभी वृक्षारोपण झाले.

त्यानंतर दक्षिण कर्नाटकातील ८-९ कारखान्यावरचे अधिकारी आणि कारखाना कर्मचारी यांना साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. आहेर यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापक सुनील यांनी प्रास्ताविक करताना, श्री. आहेर यांचा परिचय करून दिला आणि आहेर यांचा सत्कार केला.

श्री. आहेर यांनी ‘‘शून्य टक्के मिल बंद तास’’ या संकल्पनेचे महत्त्व विशद केले .श्री आहेर यांनी हे विचारपुष्प भारतरत्न सर विश्वेश्वरया यांना अर्पण केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »