दोष ना कुणाचा !

नकोच कुणाची भुतदया चुकार|
नकोच कुणाचा कार्डावर आधार||
मलाच नाही कुणी, मी तर अनाथ|
मी नाही कुणा ललनेचा प्राणनाथ||१||
आहे निरव शांतता संध्याकाळची|
आहे शक्यता मुक्कामी पोहोचण्याची||
नाही कुणी वाटेला उभी माझी दारा|
नशीबी दैव नाही, कुणी ग्रह तारा||२||
नको नशीबी सृष्टीच्या विरही कला|
नाही बघणार कदाच दृष्ट त्याला||
जे भुतकाळी कधी माझे झाले नाही|
मग स्वच्छंदी मी त्यांचा होणार नाही||३||
कसं सांगू ठिकाणां मी आहे कुठे|
मनसोक्त चालतो आहे आडवाटे||
मला परत बोलावणाराही असा|
आज सखा कोणी दिसत नाही कसा||४||
कष्टकरी जीवाला हा सोस नसावा|
मेहनतीचा मार्ग मोकळा असावा||
आताचे जग आहे दिल्या घेतल्याचे|
अन्न पाणी वस्त्र निवारा विकतचे||५||
उगवत्या सूर्याला नमस्कार केला|
तर दिवस आनंदात जाई भला||
विनाशकाले येई विपरीत बुद्धी|
एवढी नसावी मति आपली रद्दी||६||
आहेर वाळू रघुनाथ, नाशिक