नका ढोसू दारू !

आवडल्यास ही बातमी शेअर करा



नका येऊ धनी रोज दारू पिऊन|
लहान लेकरं पळती घाबरून||
  मग कशी मिळेल बापाची माया|
रोज नका डाफरु त्यांच्यावर राया||१||

रोज रोज भांडण  दारूपायी होई|
अहो तुम्ही करा ना धंदापाणी काई ||
मति खुंटली चालेना काही उपाय|
शेवटी टाकला घराबाहेर पाय||२||

चार घरचा झाडून  गुरांचा वाडा|
घालायले पोरांले भाकर तुकडा||
धुणीभांडी करून मिळे चार पैका|
नका ढोसू दारू एवढी, माझं ऐका||३||

मले तुमचं वागणं पटत नाही |
पोरा बाळांचे हाल पाहवत नाही||
त्यांची जिंदगी नका बरबाद करू|
तुमच्या दारूसाठी रोज नका मारू||४||

अहो आनंदाचा शिधा नाही पुरत|
पस्तीस किलोचं धान्य नाही उरत||
  तांबडं फुटलं लाडक्या बहिणीनं|
  तेव्हा अब्रू  राखली बचत गटानं||५||

इंजिनिअर कवी – वाळू आहेर , नाशिक.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »