चला जरा वृंदावनाला जाऊ!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

हरी बासरीने गीत गाईल |
राधा राणी झोक्यावर खेळेल||
मोहन प्रेमाने झोका देईल|
राधाकृष्णाचा जागर होईल||
चला जरा वृंदावनाला जाऊ||१||


शेकडो गवळी दादांना भेटू|
तयांची ती माखन चोरी पाहू||
बाके बिहारीचे दर्शन घेऊ|
खुप सुंदर सजावट पाहू||
चला जरा वृंदावनाला जाऊ||२||


तेथे  संतांचा कायम निवास|
हरीनामाचा तयांनाही ध्यास||
यमुनेच्या घाटावरती जाऊ|
स्नान करून पापराशी धुऊ||
चला जरा वृंदावनाला जाऊ||३||


राधा राणीचे ते पवित्र घर,|
हरीसाठी तिचा व्याकुळ स्वर||
सासर-माहेरचे हाका देती|
तरी ती कान्हाची वाट पाहती||
चला जरा वृंदावनाला जाऊ||४||


प्रेमरसाचे प्राशन करावे |
त्याचसाठी वृंदावनाला जावे||
राधाकृष्णाची रासलीला पाहू|
भक्ती रसाने ओलेचिंब होऊ||
चला जरा वृंदावनाला जाऊ||५||


इंजिनिअर कवी -वाळू आहेर, नाशिक

कवी साखर उद्याेगातील तज्ञ आहेत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »