साखर कारखाना भावगीत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुरू होते पहाटेची पाळी|
चार वाजता भल्या सकाळी||
भोंगा वाजवी रोज भुपाळी|
हजेरीला होई पळापळी||१||

आल्यात ऊसाच्या गाड्या बारा|
वजन करती भराभरा||
टेबलावरचे ऊसाचे भारे|
पडती गव्हाणीतच सारे||२||

गव्हाण चाले खूप निवांत|
जणू ती गोगलगाय शांत||
कटर करी ऊसाचा चुरा|
मिलकडे जाई तरातरा||३||

आता मिल फिरे हळूहळू|
मग रस निघे बुळूबुळू ||
तेव्हा भुस्सा पळे भरभर|
जेव्हा वाट पाही बॉयलर||४||

पेटून उठतो वाफेसाठी|
टर्बाईन फिरे वीजेसाठी||
मोटारीफिरती मीलसाठी|
कोणी फिरेल कां कुणासाठी||५||

वाफ होई नरम नरम|
वाफ करी रसाला गरम||
 पॅन करी शिरा,नितनेम|
मशिनची  साखर गरम||६||

मजूर मालक मुकादम|
सगळ्यांना मिळे दाम||
मग पडला मिलचा पट्टा|
ऊस भाव कमी हीच थट्टा||७||

रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ
नाशिक (९९५८७८२९८२)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »