‘विघ्नहर’ला प्रगतिपथावर नेणारे युवा नेते सत्यशीलदादा

चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर वाढदिवस विशेष
अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे कार्यवीर, युवा नेतृत्व करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवस… यानिमित्त शुभेच्छापर विशेष लेख…
ईश्वर त्वांच सदा रक्षदु
पुण्यकर्मणा कीर्तिमार्जय
जीवनय तव भवतु सार्थक,
इति सर्वदा मुदम प्रार्थमामहे
जन्मदिवसस्य कोटिश: शुभकामना

जुन्नर म्हटलं की शिवनेरी आणि शिवनेरी म्हटलं की जुन्नर हे समीकरण पूर्वापार चालत आले आहे. अलीकडे पहिला पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाल्यानंतर इथले निसर्ग सौंदर्य जगासमोर येत असले तरी ‘शिवजन्मभूमी शिवनेरी’ हीच जुन्नरची खरी अभिमानास्पद ओळख जनसामान्यांच्या हृदयात कायम विराजमान राहणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला ‘सर्वगुणसंपन्न जुन्नर तालुका ‘अशी सार्थ बिरुदावली या जुन्नर तालुक्याला प्राप्त झाली आहे.
“जमिनीत रुजावे झाड म्हणून,
जीवनास नवे अर्थ मिळवून ।
‘ सिंचन करू, काळजी घेऊ,
भविष्यासाठी हिरवळ फुलवू ।”
या ओळींप्रमाणे ऐतिहासिक वारसा जपत, संस्कारांची मुहूर्तमेढ रोवत सहकार तत्त्वावर उभारलेला, औदयोगिक क्रांतीची मशाल पेटविणारा असा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना याचा इतिहास पाहता शेरकर कुटुंब व त्यातील सदस्यांचे योगदान हे जुन्नर तालुक्यातील समाजाला मिळालेली एक संजीवनीच!
कर्तृत्वाचे दीप तेवत राहो,
यशाचा प्रकाश वाढत राहो।
याप्रमाणे सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे आदरणीय आपणा सगळ्यांचे श्रध्दास्थान असलेले शेठबाबा, माजी खासदार मा.श्री. निवृत्तीशेठ शेरकर यांनी सहकार तत्त्त्वावर श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. शेठबाबा हे युग प्रवर्तक असे पुरुषोत्तम होते. त्यांनी सर्व लक्ष आपल्या कारखान्यावर केंद्रित करुनही समाज जीवनात आपली भरभक्कम, खंबीर व चिकाटी, असीम त्याग यातून रोजगार मिळवून देणे ही त्यांची दूरदृष्टी होती. हा दूरदृष्टीकोन जोपासला तो आदरणीय श्री. सोपानशेठ शेरकर यांनी, कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळत ‘यशस्वी घोडदौड’ अशीच पुढे चालू ठेवलीः त्यांच्या निधनानंतर यशाची धुरा, घोडदौड, धडाडीचे नेतृत्व गाजविणारे असे कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा.श्री. सत्यशीलदादा शेरकर.
असे हे शेरकर कुटुंब जणू काही
‘अलिप्त कमळ जळी जैसे, असे निर्मळ जीवन, जगण्याचा पायंडा.”
स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी दहा गावांची शिरोली बु., कृषक सेवा सहकारी सोसायटी स्थापन केली व त्या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक समस्या मार्गी लावल्या. शेठबाबानंतर स्व. सोपानशेठ शेरकर यांनी सोसायटीचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालविला. अण्णांच्या आकस्मिक निधनानंतर दादांकडे कारखान्याचे चेअरमन पदाबरोबरच सोसायटीचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले. आजमितीला आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची कृषक सोसायटी म्हणून शिरोली बु. कृषक सेवा सहकारी संस्थेचा क्रमांक लागतो. त्यामध्ये सत्यशीलदादांचे मोठे योगदान आहे.
“अष्टपैलू” कधीही न थकणारा ऊर्जेचा स्त्रोत, एकाचवेळी अनेक संस्थांचा पदभार यशस्वीपणे सांभाळणारे असे कार्यवीर, समर्थ नेतृत्व, विघ्नहर सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन आपल्या सर्वांचे लाडके दादा.. .
सत्यशील दादा शेरकर
यांचा १२ जनिवारी हा जन्मदिवस,

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना प्रगतिपथावर नेण्यासाठी दादा हे सदैव कटिबद्ध असलेले तरुण नेतृत्व आहे. आदर्श युवा नेता, जीवाला जीव देणारा ‘मित्र’ आणि तत्त्वांची वाट दाखविणारा ‘वाटसरु’ कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सत्यशीलदादा शेरकर!
शिवजन्मभूमीत जन्मलेल्या आणि शिवतेजाचा अभिषेक झालेल्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, आध्यात्मिक, विचारवंत, अभ्यासक अशा विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असले, तरी कारखान्याच्या नियमित व्यवस्थापनात ते नेहमी सक्रिय असतात. ते करारी, स्वाभिमानी, ज्ञानी, प्रज्ञावंत, समाजभान ठेवणारे, न्यायप्रिय, प्रामाणिक, चिकित्सक, उद्योगी, गरजूंना मदत हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे.
कर्तृत्व तुमचं साऱ्या जगाला शिकवतं,
ध्येय कसं गाठायचं हे तुमच्याकडे पाहून समजतं !
कारखान्याचे अध्यक्ष श्री सोपानशेठ शेरकर यांच्या आकस्मिक जाण्याने त्यावेळी दादांवर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यावेळी त्यांचे वय अवघे 32 वर्षे होतं. अशा अवस्थेत कोणताही तरुण कोसळला असता; पण अशा या नाजूक प्रसंगी संचालक मंडळाने सत्यशीलदादा शेरकर यांचे नेतृत्व गुण, कौशल्य बघून त्यांच्यावर चेअरमन पदाची धुरा सोपवली.
आपले दुःख बाजूला ठेवून सर्व संचालक मंडळ व पदाधिकायांच्या साक्षीने त्यांनी चेअरमनपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि आत्मविश्वासाने त्यांनी शेठबाबा व अण्णा यांनी दिलेला लोकसेवेचा वारसा अखंडपणे चालू ठेवला.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही
याप्रमाणे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना, कमी वयात मोठी आव्हानं पेलवत, कारखानदारी आर्थिक अडचणीत असताना दादांनी न डगमगता धैर्याने परिस्थतीचा सामना केला व कार्यभार सुरळीतपणे सुरु ठेवला आणि यातूनच एक संयमी व धाडसी नेतृत्त्वाचा उदय झाला.
शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे लाडके नेतृत्व. कार्यसम्राट, लोकप्रिय तरुण, तडफदार युवा श्री सत्यशीलदादा शेरकर यांनी संघर्षातून शांतपणे संयमाने मार्ग काढत, सर्वांना बरोबर घेऊन समाज विकासाची भूमिका यशस्वीपणे पार करत विकास कार्याचा पर्वत उभा केला. वाड-वडीलांच्या सुसंस्काराने कर्तृत्वाला नेतृत्वाची संधी मिळाली.
नवी दिशा, नव्या आशा,
जनसेवा हीच ईश्वरसेवा !
हे तत्त्व निरंतन जपून माणुसकीचा धर्म जपला. समाजसेवेच्या संधीचे सोनं कलं.
शेतकरीभिमुख निर्णय
कामकाजाला सुरुवात करत असताना त्यांनी तंत्रज्ञान व आधुनिकतेवर जास्त भर देऊन कामामध्ये सुरुळीतपणा व पारदर्शकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देताना कारखान्याच्या कामकाजामध्ये विविध बदल केले. त्यात स्मार्ट शेतकरी कार्ड, स्मार्ट ऊस तोडणी / वाहतूकदार कार्ड, स्मार्ट कर्मचारी ओळखपत्र, स्मार्ट संचालक ओळखपत्र, डिजिटल नंबर ट्रॅकिंग सिस्टीम हे सर्व उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांच्या या शेतकरीभिमुख निर्णयांमुळे कारखान्याचे कामकाज जलदगतीने व बिनचूक होण्यास मदत झालेली आहे.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सन २०१५ मध्ये कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. तसेच 2020 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनेल विजयी झाले
आजमितीला ५००० मे. टन क्षमतेचा कारखाना ६००० मे. टन गाळप क्षमतेने चालवत आहेत. त्याचप्रमाणे १८ मे. वॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प व 30 के. एल.पी.डी. क्षमतेचा आसवाणी प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालू आहेत. डिस्टीलरी प्रकल्पाचे ३० के. एल. पी.डी. वरून 65 के.एल.पी.डी. विस्तारीकरण करुन सदरचा प्रकल्प काम चालू असून गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये सदरचा प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ५००० मे. टन वरून ७५०० मे. टन विस्तारीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मान
भारतीय शुगर या संस्थेतर्फे सन २०१७ चा भारतीय युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे.
समाजसेवेचे कंकण बांधून स्वतंत्र स्थान निर्माण करुण प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवणारे सत्यशीलदादा शेरकर यांना दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औदयोगिक क्रांतीचे प्रणेते आण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा सहकारातील सामाजिक कार्यकर्ता हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळोलला आहे.
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून व साखर व्यवसायातील या कारखान्याला देश व राज्य पातळीवरील अशी एकूण ६३ पारितोषिक/बक्षिसे मिळालेली आहेत.
सतत कारखान्याचा हिताचा ध्यास धरल्यामुळे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची विजयी पताका परदेशात फडकू लागली आहे.
केवळ उद्योजक म्हणून ते कार्य करत नाही, तर सामाजिक बांधिलकी देखील त्यांनी योग्य प्रकारे जोपासली. कारखान्याद्वारे को-जनरेशन प्रकल्प, आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्प कार्यान्वीत आहेतच; तसेच तरुणांना उत्तम व्यवसाय देखील करता यावा यासाठी श्री विघ्नहर ट्रस्ट संचालित स्व. निवृत्तीशेठ शेरकर औदयोगिक प्रशिक्षण संस्था, तसेच शेतकरी वर्गातील सर्व मुलांसाठी श्री विघ्नहर ट्रस्ट संचालित स्व. प्रा. रामकृष्णजी मोरे इंग्लिश मिडियम स्कूल देखील यांचा कार्यभार देखील उत्तम प्रकारे पाहत आहेत.
कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पुरातन कुकडेश्वराच्या शिवमंदिराचा जिर्णोध्दार केला. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन योजनेस मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देवून प्रभावीपणे ही योजना राबवित आहेत.
मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं,
सहज जरी डोकावले तरी खोल दिसावं !
असे आमचे कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर! माणसाची खरी ओळख त्याच्या कामानेच होते.
दादांनी उस उत्पादकांसाठी कारखाना उत्पादित जीवाणू लॅबमार्फत जीवाणू खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट यामार्फत मल्टीमॅक्रो न्युट्रियन्ट, वसंत ऊर्जा, ह्युमिक ॲसिड, इ.पी.एन. याचे शेतकऱ्यांना वाटप केले जाते. तसेच नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथे प्रदर्शनामध्ये श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा स्टॉल असतो.
आधुनिकीकरणाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी दरवर्षी व्हीएसआय येथे ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.
कामाप्रति असलेली निष्ठा व रात्रंदिवस वाहून घेण्याच्या वृत्तीमुळे राजकारण आणि समाजकारण यांचा सुरेख संगम दादांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात साकारला आहे.
पाय असावे जमिनीवरती
कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती
काळीज काढून देताना
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता तू बेहत्तर… याप्रमाणे जुन्नरचा हा ढाण्या वाघ समाजसेवेचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात.
“बिबट्या हल्ला” प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून त्यावर काय प्रतिबंध करता येतील. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतः ते आंदोलनात सहभागी झाले; तसेच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याही आंदोलनात ते हिरीरीने सहभागी होते.
नाचू कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लावू जगी ||
या संतांच्या उक्तीप्रमाणे आहेत निरपेक्ष अंतःकरणाचे दादा!
जुन्नर तालुक्याचा सामाजिक, राजकीय इतिहास त्यांच्या कार्याशिवाय पूर्ण होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.
या ऊर्जावंत व्यक्तीकडून येणा-या पिढीने काही मागायचे ठरवले तर नक्कीच निस्वार्थीपणा आणि लोकहितकारी समाजदृष्टीकोन मागावा.
कारखान्याचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, जुन्नर तालुक्याचा विकास, तरुणाईचा विकास हीच माझी सर्वोच्च जबाबदारी आहे या भावनेतून दादा दिवस-रात्र मेहनत करतात. हे सर्व करत असताना ते वडीलधारी मंडळी व जेष्ठांचा तसेच कामगारांचाही सदैव सन्मान करतात.
प्रेमाची हाक येता
साद द्यायची असते!
कुणी काय म्हणेल
हे विचारायचे नसते!!
असा आदर्श, प्रेरणा त्यांनी तरुण युवापिढीला दिली. श्री सत्यशीलदादा शेरकर गेली १२ वर्षे तालुक्यामध्ये राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून काम करत असून युवकांचे संघटन करून, जेष्ठांना बरोबर घेऊन तालुक्याची ध्येय, धोरणे व विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत.
आणि त्यामुळेच तरुणपिढी दादांकडे ‘आदर्श नेता’ म्हणून पाहत आहे. जाणकार व वडीलधारी मंडळी आपल्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
केवळ व्यावसायिक पुस्तकं वाचून किंवा व्याख्या पाठ करून यशस्वी उद्योजक जन्माला येत नाही. तर त्याला आलेल्या स्वतःच्या बऱ्यावाईट अनुभवातूनच तो यशस्वी होतो. धडाडीने निर्णय घेणे आणि दिलेल्या शब्दाला जागत व्यवसायात पुढे जाणे. यात मी किती यशस्वी झालो याच मूल्यमापन येणारा काळच ठरवेल, असे सांगणारे एक नामांकित वारस म्हणून आपल्या कुटुंबाची परंपरा नव्या उंचीवर नेऊन उज्ज्वल करणाऱ्या व जनआशीर्वादाच्या शिदोरीवर उदयाला आलेले हे नेतृत्व भविष्यात आणखी मोठी भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही.
सत्यशीलदादा शेरकर शेठबाबांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. यात शंकाच नाही. शांत व संयमी… जोडीला अभ्यासू नेतृत्व असे गुण असल्याने कारखान्याच्या विकासकामांना अधिक गती मिळत आहे.. त्याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
अशा या “तेजोमय भास्कर” व्यक्तिमत्त्वास विघ्नहर परिवारातर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा .
शब्दांकन- सौ. स्मिता नवले