वारसा डळमळला …

कलीयुगी काळवेळ बदलला|
मानवाच्या बुद्धीला पडली छिद्र||
त्याने मानवी विचार बदलला|
पण नाही बदलले सुर्य चंद्र||१||
खिसा रिकामा पण ऐट जोमानं|
पाहुण्यांनी भरेघरआनंदानं||
काका,मामा, दादा,नाना यांना मान|
मावशीसह,सगळ्यांचा सन्मान||२||
होती पोरं लाडाची एक समान|
भाऊ भाऊ दिसती रामलक्ष्मण||
सगळेआजोबांचे वारसदार|
घरीदारी होते एकच चुल्हाण||३||
चटणी भाकरी न कांदा लसूण|
खायचे, तयांना हेच पकवान||
येत नसे थकवा काम करून|
गावी लेकीबाळींनाही होता मान||४||
देवा या कलियुगात दशा झाली|
जेव्हा माणसाची मती भ्रष्ट झाली||
शेतात,मळ्यांत भावकी मोडली|
मानवी लालसेने घरं फोडली||५||
बारने ,टीव्हीने समाज तोडला|
मोबाईलने परिवार तुटला||
तेव्हा सभ्यतेचा बुरखा फाटला|
संस्कृतीचा वारसा डळमळला||६||
आहेर वाळू रघुनाथ (नाशिक )
बीई एमआयई बीओई






