“एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास “
नॅचरल शुगर येथे आहेर यांचे व्याख्यान
लातूर : साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेच्या अंमलबजावणीवर नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी (जि. उस्मानाबाद) या साखर कारखान्यावर परवा व्याख्यान झाले.
साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली, जनरल मॅनेजर श्री. दिवेकर आणि समीर सय्यद यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, अधिकारी आणि कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठीआणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार श्री.आहेर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
श्री. दिवेकर यांनी प्रास्ताविक करताना, श्री. आहेर यांचा परिचय करून दिला आणि “एकच ध्यास, एकच ध्यास” “शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेचे महत्त्व विशद केले.
श्री. आहेर यांनी हे विचारपुष्प श्री. ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण केले. नंतर श्री. आहेर यांनी, कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर लाखो करोडो रुपयांचे नुकसान होते हे आकडवारीनिशी आणि कारखाना स्टॉपेजेसच्या संदर्भासह व्यवस्थितपणे समजून सांगितले.
यावर उपाययोजना म्हणून “एकच ध्यास,एकच ध्यास” “शून्य टक्के मिल बंद तास’’ या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली आणि किमान पाच-दहा टक्के स्टाॅपेजेस आपण सुयोग्य नियोजन करून अनलोडर ते शुगर ग्रेडर पर्यंतचे ऑफ सीझन मध्येच कसोशीने मेंटेनन्स करून वेळेचे, कामगारांचे, स्पेशल पार्टचे आणि व्यवस्थापनातर्फे आर्थिक नियोजन करून आपण साखर कारखान्यावर “शून्य टक्के मील बंद तास’’ या संकल्पनेची अंमलबजावणी करू शकतो आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळता येते, असे पटवून दिले.
दुपारच्या सत्रात हाय प्रेशर बॉयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ऑफ सीझनमध्ये करावयाचे मेंटेनन्स, तसेच बॉयलरबाबत शासकीय नियमांचे पालन शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी काही टिप्स श्री. आहेर यांनी दिल्या.
शेवटी प्रश्नोत्तराच्या सत्रात आहेर यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन शंका-समाधान केले. यावेळी वर्क्स मॅनेजर श्री. भोरकडे आणि त्यांचे सहकारी सर्व इंजिनिअर आणि चिफ केमिस्ट श्री. गायकवाड, सर्व केमिस्ट आणि सर्व कामगार बांधव आवर्जून उपस्थित होते. श्री.भोरकडे यांनी आभारप्रदर्शन केले आणि नंतर ठोंबरे यांचा वाढदिवसानिमित्त हृद्य सत्कार केला.