आदिनाथ साखर कारखाना प्रशासकाच्या ताब्यात

सोलापूर : करमाळा येथील शिवसेनेच्या नेत्या व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रश्मी बागल यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणूक घेण्यास कुचराई केल्याचा ठपका ठेवत, कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासक म्हणून सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बेंद्रे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.
प्रादेशिक सह संचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी बेंद्रे यांची नियुक्ती केली आहे..