माहेर माझे बाष्पके संचालनालय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारची साखर कविता

जुने जाणते तंत्र विशारद अन्‌ सल्लागार ।
जणु आहेत ते विश्वकर्मा व्यास पराशर
घेती बाष्पक नियमांची परीक्षा कठोर।।

घडविती अभियंते बंधु आणि परिचर ।
पालन करिती माझे जसा सखा जीवाचा।।

मी बाष्पक , उपासक ऊर्जाशक्तीचा।
धरणीवर अवतार मी तंत्रशक्तीचा ।।

भट्टीत जळे कोळसा तेलवायू गाठी भुश्शाच्या ।
अंतरंगी तयार होती लाटा धुराच्या आणि वाफेच्या।।

वाफेने जनित्र फिरे गरगरा ।
वीज तयार होई भरभरा ।।

चिमणीतून धुम्रवलये आकाशी सोडून मी नामोनिराळा ।
वेश असे बावळा परि अंतरी नाना कळा ।।

नियमांचा मी बांधील तंत्रज्ञांना माझा लळा ।
चाकोरीबाहेरच्यांचा नाही मज कळवळा।।

आहे माहेर माझे बाष्पके संचालनालय।

सासर माझे कारखाने जणु कंटकालय।।

करिता कुणी छेडछाड मी धारण करि रुद्रावतार ।
हैराण करि नतद्रष्टा सोडून वाफ अपार ।।

सोडी आग आणि उष्णतेचे फवारे फार।
मी बाष्पक करि माणसावर उपकार ।।

रचनाकार:
वा.र. आहेर (नासिक)
प्रथितयश साखर सल्लागार
(टीप : बाष्पके म्हणजे बॉयलर)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »