वायसा
वायसा का करिसी का का ?
का का रव होता अंगणी
अतिथी आगमनाची लागे चाहूल
घरात आनंद स्वागताचा अपार ॥१॥
आई भरवितांना बाळाला म्हणे
एक घास काऊचा एक घास चिऊचा
मायेचा एक घास मिळे तुलाही
तुझा लागे लळा बाळालाही ॥२॥
एकाक्ष म्हणति हो तुला
भक्ष्य ना सुटे नजरेतून तुझ्या
मिळेपर्यंत काव काव चा गजर
तीक्ष्ण आहे कावळ्याची नजर ॥३॥
तू आहेस धर्माचा ठेकेदार
पिंडाला शिवताच होई जन उध्दार
तेव्हा होई लौकिक मिळे आदर
अशी अंधश्रद्धा आहे अपार॥४॥
सुरईतले पाणी हुशारीने प्यायला
तुझ्या हुशारीचा परीणाम दिसला
काऊ चिऊ वाटतात आपले मला
मित्रा वायसा माझा सलाम तुला ॥५॥
रचनाकार:
आहेर वा.र. (नासिक )
बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२