काय आहे ‘बारामती ॲग्रो’चे प्रकरण?, घ्या जाणून….

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राजकीय नेत्यांनी कथितपणे फसवल्याचे प्रकरण २०१२ पासून गाजत आहे. या प्रकरणी 2020 मध्ये, मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिली होती. मात्र त्याला ईडीने न्यायालयात विरोध केला होता.
ईडीचे म्हणणे आहे की, कन्नड सहकारी साखर कारखाना या आजारी कारखान्याची खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला बारामती ॲग्रोने तिच्या ‘कॅश क्रेडिट अकाउंट’मधून पाच कोटींची रक्कम देऊन बोली लावण्यास सांगितले. वास्तविक हा निधी बारामती ॲग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने मंजूर करण्यात आला होता. अशा प्रकारे बारामतीने ॲग्रोने कर्जापोटी मिळालेली रक्कम दुसऱ्याच कारणासाठी वापरली.
ईडीचा रोख बारामती अॅग्रोचे एमडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाच्या अनुमतीखेरीज एवढ्या मोठ्या प्रमाणावरील गैरप्रकार होऊ शकत नाही, असा तिचा दावा आहे.
“कन्नड सहकारी साखर कारखान्याने MSC बँकेकडून कर्ज घेतले आहे, MSCB ने लिलावाद्वारे SARFAESI कायद्यांतर्गत कन्नड साखर कारखाना लिलावाच्या माध्यमातून सुमारे ५० कोटी रुपयांना विकला. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2012 मध्ये हा व्यवहार झाला. हा कारखाना अंतिमत: बारामती ॲग्रो ने विकत घेतला.
बारामती ॲग्रो सोबतच हायटेक इंजिनीअर्स कॉर्पोरेशन इंडिया लि. सह इतर दोन कंपन्या लिलावाच्या बोली प्रक्रियेत होत्या. लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या हायटेक इंजिनिअर्स कंपनीच्या बँक खात्यांच्या छाननीतून असे आढळून आले की, 25 ऑगस्ट 2012 रोजी हायटेक इंजिनीअरला रु. बारामती ऍग्रो लि.कडून 5 कोटी रुपये मिळाले. नंतर, म्हणजे दोनच दिवसांनी ‘हायटेक’ने कन्नड साखर कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत बोली लावण्यासाठी अनामत रक्कम भरण्याकरिता या रकमेचा वापर केला, असे चौकशीत आढळून आल्याचे ‘ईडी’ने त्यावेळी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.
त्यात पुढे म्हटले आहे की, हायटेक इंजि. ही कंपनीत दिवाळखोरीत निघालेली आहे आणि तिच्या खात्यात बारामती ॲग्रोने आपल्या कॅश क्रेडिट अकाउंटमधून पाच कोटी वळते केले होते. प्रथमदर्शनी हा गैरव्यहार आहे, कारण बारामती ॲग्रोला ही रक्कम खेळते भांडवल म्हणून मंजूर झालेली होती.
आर्थिक गुन्हे शाखेचा दावा इडीच्या उलट
मात्र, याच व्यवहारावर, मुंबई पोलिसांच्या EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेने ईडीच्या अगदी उलट दावा केलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, Hitech Engg ही कंपनी बारामती ॲग्रोची व्हेंडर आहे आणि तिच्या थकबाकीपोटी बारामती ॲग्राने सदरहू रक्कम अदा केला होती.
आर्थिक गुन्हे शाखादेखील एमएससी बँकेच्या संदर्भातील कथित 25000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करत आहे.
या प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी रंगली होती. त्यावेळी खुद्द पवारच मुंबईतील ‘इडी’ कार्यालयात गेले होते. त्यांच्यासोबत पक्षाचे हजारो समर्थक होते. पवारांच्या या खेळीने ‘ईडी’ चे अधिकारी हैराण झाले होते.
[…] […]