१७ वे कामगार साहित्य संमेलन
महाराष्ट्र शासन – कामगार विभाग , महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने यावर्षी मिरज येथे कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
यावेळी महाराष्ट्रातील जेष्ठ व नामवंत, ख्यातनाम असे साहित्यिक, कलावंत, कवी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. साहित्याची मोठी मेजवाणी लाभणार आहे. उपस्थिती करीता महाराष्ट्रातील सर्वांसाठी हे संमेलन खुले असणार आहे.
दिनांक: २४ व २५ फेब्रुवारी २०२३
दोन दिवसीय.
स्थळ: मिरज, सांगली.
- फक्त उपस्थिती मोफत आहे.
- दोन दिवसांची खानपानसह निवास व्यवस्था रु. ५००/-
- दोन दिवसांसाठी केवळ खानपान व्यवस्था रु. २००/-
- (मानपान मध्ये ३ जेवण, २ नाश्ता, ४ चहा याचा समावेश असेल.)
- निवास /जेवण करीता विहित नमुण्यातील अर्ज भरावा.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा
श्री रुपेश राजाराम मोरे
केंद्र संचालक, कामगार कल्याण केंद्र,कराड
फोन : *9049507806, 8087385979
महाराष्ट्रातील ख्यातमनाम साहित्यिकांना अनुभवण्याची नामी संधी आपण सोडून नये. हे कामगार व इतर सर्वांसाठी असणारे साहित्याचे स्नेहसंमेलन आवर्जुन अनुभवावे, असे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने केले आहे.
कोण सहभागी होऊ शकते
ज्या कामगार कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर २०२२ मधील वेतनातुन रु. १२/- इतका कामगार कल्याण निधी कपात झालेला आहे./ LWF. आणि बांधकाम कामगार व सुरक्षा रक्षक कर्मचारी यांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे.
विविध साहित्य लेखन स्पर्धा
✒️ कविता लेखन स्पर्धा
(पद्मश्री नारायन सुर्वे पुरस्कार)
✒️ कथा लेखन स्पर्धा
( ह.ना. आपटे पुरस्कार)
✒️ वैचारिक लेखन स्पर्धा
(लोकहितवादी पुरस्कार)
विषय: राष्ट्र उत्थानासाठी कामगारांचा सहभाग. (शब्द मर्यादा -२००० शब्द)
✒️ नाट्य लेखन स्पर्धा
(मामा वरेरकर पुरस्कार)
मंडळाच्या विभागीय नाट्य स्पर्धेत सहभागी कामगार नाट्य लेखकांच्या नाट्य संहिता स्पर्धेसाठी पाठवाव्यात.
🌀🍁 पारतोषिके
🏆 प्रथम ₹. ५०००/-
🏆 द्वितीय ₹.३०००/-
🏆 तृतीय ₹. २०००/-
🏆 उत्तेजनार्थ २ ₹.१०००/- प्र.
🔅 विजेत्यांना साहित्य संमेलनात गौरविण्यात येणार आहे.
🔅 *कथा व कविता लेखन स्पर्धेतील विजेत्यांना नवोदितांचे कवि संमेलन व कथाकथन या सत्रात सहभाग घेता येईल.
कामगार साहित्यिकांनी आपले स्वलिखित साहित्य, साहित्य लेखन स्पर्धा अशा शिर्षकासह खालील पत्त्यावर दिनांक.८ फेब्रुवारी २०२३ पूर्वी पाठवावे.
साहित्य पाठविण्याचा पत्ता
मा. कल्याण आयुक्त
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
प्रशासकीय कार्यालय,
हुतात्मा बाबु गेणु मुंबई गिरणी कामगार क्रिडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
प्रभादेवी (पश्चिम)
मुंबई – ४०००१३
कोल्हापूर संपर्क
विजय शिंगाडे
कामगार कल्याण अधिकारी, कोल्हापूर
0231-2644772
संघसेन शांताप्रल्हाद जगतकर
8856891663