जागतिक चहा दिन
आज रविवार, डिसेंबर १५, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २४, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०४
चंद्रोदय : १७:५८ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – १४:३१ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – ०२:२०, डिसेंबर १६ पर्यंत
योग : शुभ – ०२:०४, डिसेंबर १६ पर्यंत
करण : बव – १४:३१ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०१:२५, डिसेंबर १६ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक – २२:१९ पर्यंत
चंद्र राशि : वृषभ – १५:०४ पर्यंत
राहुकाल : १६:४१ ते १८:०४
गुलिक काल : १५:१९ ते १६:४१
यमगण्ड : १२:३४ ते १३:५६
अभिजितमुहूर्त : १२:१२ ते १२:५६
दुर्मुहूर्त : १६:३६ ते १७:२०
अमृत काल : १८:०६ ते १९:३६
वर्ज्य : ०९:०८ ते १०:३८
आज जागतिक चहा दिन आहे.
समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे – मानवशास्त्र व समाजशास्त्र या विषयांतील जागतिक कीर्तीच्या संशोधिका; तितक्याच उत्कृष्ट लेखिका आणि स्वत:च स्त्री-स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत !
समाजाबद्दलचे लोकांचे आकलन समृद्ध करणार्या; सामाजिक, सांस्कृतिक व शारीरिक मानव- शास्त्रावर प्रभुत्व सिद्ध करणार्या जागतिक कीर्तीच्या संशोधक डॉ. इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशात झाला.
मूळच्या इरावती गणेश करमरकर यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, आणि १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्याच वर्षी त्यांचा विवाह महर्षी कर्वे यांचे चिरंजीव डॉ. दिनकर कर्वे यांच्याशी झाला. ज्येष्ठ समाज-शास्त्रज्ञ डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ’परशुरामाबाबत दंतकथा’ व ’चित्पावन ब्राम्हण’ अशा दोन प्रबंधांचा अभ्यास करून त्यांनी १९२८ साली मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी मिळवली.
१९२८-३० या काळात बर्लिन विद्यापीठातून ’मानवी कवटीच्या भागांचे एकमेकांशी प्रमाण’ या विषयावर त्यांनी पी.एच.डी. केली. पुढे त्यांनी काही काळ एस. एन. डी. टी. विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिले.पुण्यातील सुप्रसिद्ध डेक्कन कॉलेज येथे इरावतीबाईंनी सुमारे ४० वर्षे मानवशास्त्र विभागात प्रमुख म्हणून कार्य केले, संशोधन केले. तसेच काही काळ पुणे विद्यापीठात समाजशास्त्राचे अध्यापन केले.
जगात त्या त्यांच्या भारतातील नातेदारी व्यवस्थेवरील अभ्यासासाठी; ’भारतातील नातेदारी पद्धतीने संघटन’ या पुस्तकामुळे (भारतातील कुटुंबव्यवस्था व नातेसंबंध यांचा संशोधनात्मक आढावा घेणारे पुस्तक) मानव-शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. या पुस्तकात इरावतीबाईंनी भारतातील सर्व भाषिक समूहांतील नातेवाचक संज्ञांचा तपशीलवार आढावा घेतला आहे.
इरावतीबाईंनी शास्त्रज्ञ म्हणून मानवशास्त्राच्या सर्व उपशाखांच्या – सामाजिक, सांस्कृतिक, शरीरमानवशास्त्र, पुरातत्त्वविज्ञान, भाषाविज्ञान या उपशाखांच्या – अध्ययनात व लेखनात आपला ठसा उमटवला आहे. इरावतीबाईंनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.
समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.
ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.
दुचाकी (स्कूटर) चालवणार्या पुण्यातील पहिल्या महिला (१९५२) असाही त्यांचा लौकिक आहे. ‘स्त्री-स्वातंत्र्या’ बाबतच्या त्यांच्या कल्पना अतिशय आधुनिक होत्या. त्या काळी स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढणार्या स्त्रियांना उद्देशून त्या म्हणत, ‘बायांनो, पुरुषांशी भांडताना फक्त समान हक्कांसाठी काय भांडता? नेहमी जास्त हक्कांसाठी भांडत जा.’
१९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट, १९७०)
- घटना :
१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले. - मृत्यू :
• १७४९: छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. (जन्म: १८ मे ,१६८२)
• १९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर, १८७५)
- जन्म :
१९३२ : प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी, आठ भाषांचे जाणकार, १० वे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन (तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन ) यांचा जन्म (मृत्यू: १० नोव्हेंबर २०१९)
१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट, २०१४)
१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.
१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक डॉ. कल्याण वासुदेव काळे यांचा जन्म.
१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.