मनाला निराश करू नका

काम करा जरा काम करा |
जगी आला तर काम करा||
इथे जन्माचे सार्थक करा|
समाजोपयोगी काम करा||
व्यर्थ न जाय मानव जन्म|
मनाला निराश करू नका||१||
मुहूर्ताची वेळ वाया जायी|
उपकार हा वाया न जायी||
जग स्वप्नमय मानूं नका|
मार्ग आपला करा प्रशस्त||
ईश्वर आहे पाठीशी उभा |
मनाला निराश करू नका||२||
जर सर्व सत्वे ठायी आहे|
तर मग सत्व कुठे जाई||
सत्वरुप आचरण करा|
उठा आणि मोठं कार्य करा||
भार आपला नको कुणाला|
मनाला निराश करू नका||३||
आपला गौरव ध्यानी ठेवा|
स्वाभिमान हा जागृत ठेवा||
जगण्याची कला त्यागू नका|
मरावे , किर्ती रूपे उरावे||
सर्व गेलं तरी ताठ रहा|
मनाला निराश करू नका||४||
ईश्वराने सर्व काही दिलं|
जरूरीच्या सर्व वस्तू दिल्या||
आता तुम्ही ध्येय प्राप्त करा|
कुठे ही धन अप्राप्य नाही||
नाही झाले हा दोष कुणाचा|
मनाला निराश करू नका||५||
नाही मला सन्मानाची हाव|
ना त्या सुखाची लालसा आहे||
प्रभुची लेकरं सारी आम्ही|
तयाला सर्वही खूप प्यारी||
तयांनाअशक्य काय आहे|
मनाला निराश करू नका||६||
वादविवाद हा करू नका|
आपलं लक्ष्य ,हे साध्य करा||
निर्माण कार्य हा विधी आहे|
त्यामुळे मी आनंदी राहतो||
पतित पावना जाणून घ्या|
मनाला निराश करू नका||७||
आहेर वाळू रघुनाथ (नाशिक)






