दिल्लीच्या मेळाव्याला शेट्टी यांची उपस्थिती

नवी दिल्ली- रोजगार चळवळीला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच अनेक शेतकरी नेते आणि संघटनांनी जंतरमंतर येथे ‘रोजगार संसद’ मध्ये भाग घेतला, असे संयोजक संयुक्त रोजगार आंदोलन समिती (SRAS) च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीदेखील उपस्थित होते.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी सीमेवर रोखले, असा आरोप यात करण्यात आला आहे.
दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आणि ‘देश की बात फाऊंडेशन’चे संस्थापक गोपाल राय म्हणाले की, केंद्र सरकार रोजगार चळवळ दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह, राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे निमंत्रक व्हीएम सिंह, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी लोकसभा खासदार राजू शेट्टी, भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंह चदुनी, भारतीय किसान युनियन (अंबावत)चे राष्ट्रीय अध्यक्ष ऋषीपाल अंबावत, आंदोलनात सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे.