उसाचे उत्पादन घटणार ६.६ टक्क्यांनी!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई ः  चालू आर्थिक वर्षात राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्राची आर्थिक वाढ ८.७ टक्के होईल, असे आर्थिक पाहणीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याच अहवालानुसार याच २०२४-२५ या खरीप हंगामात राज्यातील ऊस उत्पादनात तब्बल ६.६ टक्के, तर रब्बी हंगामात तेलबियांच्या उत्पादनात मागील वर्षांच्या तुलनेत २२.७ टक्के घट अपेक्षित आहे. याच काळातील खरीप व रब्बी हंगामात तृणधान्ये व कडधान्ये यांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाजही राज्य  सरकारने वर्तविला आहे.

२०२०-२१ मध्ये राज्यात १ कोटी ११ लाख ६४२ टन उसाचे उत्पादन झाले होते. २०२३-२४ वर्षात यात वाढ होऊन हे उत्पादन १ कोटी १२ लाख ६२७ कोटी टनांवर पोहोचले. यावर्षी ऊस उत्पादनात ६.६ टक्के घट होणार असल्याने साखर कारखान्यांना उसाची टंचाई जाणवू शकते.

राज्यात २०२४ च्या मान्सूनच्या मोसमात सरासरी पावसाच्या ११६.८ टक्के पाऊस पडला. राज्यातील २०३ तालुक्यांमध्ये अतिरिक्त, ६८ तालुक्यांमध्ये सरासरी आणि ८४ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडल्याचे आर्थिक पाहणीत म्हटले आहे.

२०२४-२५ च्या खरीप हंगामात १५७.५९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २४-२५ च्या खरीप हंगामात तृणधान्यांच्या उत्पादनात ४९.२ टक्के, कडधान्यांच्या उत्पादनात ४८.१ टक्के, तेलबियांच्या उत्पादनात २६.९ टक्के व कापूस उत्पादनात १०.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. याच कालावधीत ऊस उत्पादन मात्र ६.६ टक्क्यांनी घटणार आहे.

२०२४-२५ च्या रब्बी हंगामात ६२.८१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्यांच्या उत्पादनात २३ टक्के, उत्पादनात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. याच कालावधीत तेलबियांचे उत्पादन मात्र २२.७टक्क्यांनी घटणार आहे. २०२३-२४ या कालावधीत २१.७४० लाख हेक्टर क्षेत्रावर फलोत्पादन केले जात असून यातून ३२६.८८ लाख मेट्रिक टन फळांचे उत्पादन अपेक्षित आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »